सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 07:25 IST2025-06-03T07:22:55+5:302025-06-03T07:25:00+5:30

उत्तर सिक्कीममधील लाचुंगमध्ये अडकलेल्या १,६७८ पर्यटकांची सुटका

3 jawans killed, 6 missing in landslide in Sikkim; Over 100 people trapped in Lachen | सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले

सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले

गंगटोक: सिक्कीममधील छातेन येथील लष्करी छावणीवर सोमवारी भूस्खलन झाल्याने 3 जवानांचा मृत्यू झाला असून सहा जवान बेपत्ता झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास मंगन जिल्ह्यातील लाचेन नगरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. यात ३ जवानांचा मृत्यू झाला. हवालदार लखविंदर सिंग, लान्स नायक मुनीश ठाकूर आणि अभिषेक लखाडा अशी मृत जवानांची नावे आहेत. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

१,६७८ पर्यटकांची सुटका

उत्तर सिक्कीममधील लाचुंगमध्ये अडकलेल्या १,६७८ पर्यटकांची सुटका करण्यात आलीna आहे. या पर्यटकांना घेऊन जाणारी १८ वाहनांची पहिली तुकडी लोअर जोंगूच्या फिदांगमध्ये पोहोचली आहे, तर लाचेनमध्ये अजूनही १०० हून अधिक लोक अडकले आहेत. पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी मांगनचे जिल्हाधिकारी अनंत जैन यांनी ताफ्याचे नेतृत्व केले. २८४ वाहने, १६ दुचाकींसह १,६७८ पर्यटकांचा आणखी एक ताफा थेंग चेकपोस्ट ओलांडून फिदांगकडे निघाला आहे. यात ७३७ पुरुष आणि ५६१ महिला व ३८० मुलांचा समावेश आहे.

Web Title: 3 jawans killed, 6 missing in landslide in Sikkim; Over 100 people trapped in Lachen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.