शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
3
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
4
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
5
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
6
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
7
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
8
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
9
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
10
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
11
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
12
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
13
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
14
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
15
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
16
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
17
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
18
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
19
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
20
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 11:31 IST

National Highway News: रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असतानाही राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) नुकतेच फटकारले आहे.

नवी दिल्ली - रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असतानाही राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) नुकतेच फटकारले आहे. गेल्या पाच वर्षांत झालेले अपघात आणि टोल नाक्यांवरील वादामुळे चिंता निर्माण झाली असून, यावर कोर्टाने कारवाईची मागणी केली आहे. 

अर्थ मंत्रालय आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या २०२०-२४ च्या अपघात आणि नुकसानीवरील अहवालानुसार, पाच वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गांवर २.५ लाख अपघात झाले. यात ८०,००० लोकांचा मृत्यू झाला आणि २.३ लाख लोक जखमी झाले. २०२४ मध्ये, ४८,००० अपघातांमध्ये १७,२०० मृत्यूंची नोंद झाली. २०२४-२५ या आर्थिक वर्षात, भारतातील राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुलीतून सुमारे ८५,००० कोटी रुपये कमावले गेले. तरीही देशातील १.४६ लाख किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांपैकी २०% (२९,२०० किमी) राष्ट्रीय महामार्ग ८०-१०० किमी/ताशी वेगाने प्रवास करण्यासाठी असुरक्षित आहेत आणि तेही विशेषतः खराब रस्ते आणि अरुंद वळणांमुळे. 

टोल नाक्यांवर हाणामारी२०२०-२४ मध्ये, राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यावर ४,५०० मारहाणीच्या घटना घडल्या. यात उत्तर प्रदेश (१,२००), राजस्थान (९००) आणि हरयाणा (८००) यांचासमावेश आहे.  एकूण ४,५०० प्रकरणांपैकी फक्त १,८०० प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आणि १,२०० लोकांवर कारवाई (दंड किंवा अटक) करण्यात आली, असे अहवालात स्पष्ट होते.

अपघातांची कारणेरस्ते वाहतूक मंत्रालय आणि आयआयटी दिल्ली यांनी २०२४ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ७५.२% अपघात अतिवेगाने, २.५% दारू पिऊन गाडी चालवल्याने आणि १०% तांत्रिक बिघाडांमुळे (खड्डे, खराब सिग्नल, तुटलेले डिव्हायडर) झाले आहेत. २.५ लाख अपघात गेल्या ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर झाले. यात ८० हजार मृत्यू, २.३ लाख जण गंभीर जखमी झाले.

टॅग्स :highwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूकPotholeखड्डेtollplazaटोलनाका