आग्र्यात बसचा भीषण अपघात; 29 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 08:44 IST2019-07-08T08:05:28+5:302019-07-08T08:44:31+5:30

लखनऊहून दिल्लीला जाणाऱ्या बसला अपघात

29 persons dead after a bus fell into jharna nalla on Yamuna Expressway in Agra | आग्र्यात बसचा भीषण अपघात; 29 जणांचा मृत्यू

आग्र्यात बसचा भीषण अपघात; 29 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला आहे. लखनऊहून दिल्लीला जात असलेल्या बसला आग्र्याजवळ अपघात झाला. चाळीस प्रवाशांना घेऊन जाणारी बस नाल्यात कोसळली. पहाटेच्या सुमारास नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. सध्या दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.




दिल्लीला जात असणारी प्रवासी बस आग्र्याजवळ झरना नाल्यात कोसळली. सध्या घटनास्थळी पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केलं. जखमींपर्यंत आवश्यक मदत पोहोचवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 




अपघातग्रस्त बस अवध आगाराची होती. अपघातानंतर उत्तर प्रदेश रस्ते वाहतूक प्राधिकरणानं मदतीची घोषणा केली. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात काही महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. 

Web Title: 29 persons dead after a bus fell into jharna nalla on Yamuna Expressway in Agra