शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

भाजपविरोधी घोषणा दिल्याने 28 वर्षीय विद्यार्थीनीला चक्क तुरुंगात टाकले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 9:23 AM

चेन्नई - भाजपविरुद्ध घोषणाबाजी केल्यामुळे एका विद्यार्थीनीला अटक करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या तुतीकोरीन जिल्ह्यात ही घटना घडली. येथील 28 वर्षीय विद्यार्थीनी कॅनडा येथे शिक्षण घेत आहे. या विद्यार्थीनीने विमानातून प्रवास करतेवेळी तामिळनाडूचे भाजपाध्यक्ष तामिलीसाई सौंदराराजन यांच्यासमोर भाजपविरोधी घोषणा दिल्या. तसेच विमानतळावर उतरल्यानंतरही या विद्यार्थीनीने हुकूमशाही भाजप सरकारला खाली खेचा, असे म्हणत भाजपविरोधी नारेबाजी ...

चेन्नई - भाजपविरुद्ध घोषणाबाजी केल्यामुळे एका विद्यार्थीनीला अटक करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या तुतीकोरीन जिल्ह्यात ही घटना घडली. येथील 28 वर्षीय विद्यार्थीनी कॅनडा येथे शिक्षण घेत आहे. या विद्यार्थीनीने विमानातून प्रवास करतेवेळी तामिळनाडूचेभाजपाध्यक्ष तामिलीसाई सौंदराराजन यांच्यासमोर भाजपविरोधी घोषणा दिल्या. तसेच विमानतळावर उतरल्यानंतरही या विद्यार्थीनीने हुकूमशाही भाजप सरकारला खाली खेचा, असे म्हणत भाजपविरोधी नारेबाजी केली होती. 

लुईस सोफिया असे या विद्यार्थीनीचे नाव असून ती कॅनडाहून आपल्या चेन्नईतील घरी परतत असताना ही घटना घडली. तामिळनाडूचे भाजपाध्यक्ष सौंदरराजन यांनी विमानतळ पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर, सोफियाला अटक करण्यात आल्याचे तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे. याप्रकरणी सोफियाला अटक केल्यानंतर 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सोफियाचे वकिल ई अथिसायकुमार यांनी दिली.

सोफियाविरुद्ध तामिळनाडू पोलीस कायद्यातील तरतुदीनुसार आयपीसीच्या कलम 505, कलम 290 आणि कलम 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर सोफियाला महिला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी, न्यायालयाने तिला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे तुतीकोरीन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुरली रम्बा यांनी सांगितले. दरम्यान, तामिनाडूतील डीएमकेचे नेते एम.के. स्टॅलिन यांनी सोफियाच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच लाखो लोक भाजपविरुद्ध नारेबाजी करत आहेत, तुम्ही त्यांनाही अटक केली पाहिजे. मीही भाजपविरुद्ध नारेबाजी करतो, मलाही अटक करा, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. या घटनेने तामिळनाडूसह देशात खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाTamilnaduतामिळनाडूjailतुरुंग