शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

Video: 27 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींना दहशतवाद्यांनी दिली होती 'ही' धमकी! अखेर बदला घेतलाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 10:56 AM

दहशतवादी भारताचा तिरंगा जमिनीवर फेकून देत असे, अनेक भागात तिरंगा जाळण्यात येत होता

नवी दिल्ली - सोमवारी मोदी सरकारने काश्मीरातून कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे देशभरातून नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कलम 370 हटविल्यामुळे जम्मू काश्मीरला केंद्रशासित राज्याचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे काश्मीरमधील लोकांचे दुहेरी नागरिकत्व संपुष्टात आलं आहे. राज्यात वेगळं निशाण फडकवता येणार नाही. कलम 370 हटविणे हे भाजपाच्या जाहीरनाम्यातील आश्वासन होतं. तसेच वर्षोनुवर्ष ही मागणी भाजपाने लावून धरली होती. 

70 वर्षापूर्वी करण्यात आलेली चूक मोदींनी दुरुस्त केली असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. या निर्णयानंतर नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत लाल चौकात तिरंगा फडकवताना नरेंद्र मोदी दिसत आहेत. हा तिरंगा फडकवताना मोदींनी दहशतवाद्यांना आव्हान दिलं होतं. 

या व्हिडीओमध्ये मोदी म्हणतात की, मला आठवतंय की, 1992 मध्ये तिरंगा फडकविण्यासाठी मी काश्मीरला गेलो होतो. त्यावेळी दहशतवाद मोठ्या प्रमाणात सुरु होता. दहशतवादी भारताचा तिरंगा जमिनीवर फेकून देत असे, अनेक भागात तिरंगा जाळण्यात येत होता. देशाच्या ध्वजाचा अपमान केला जात होता. तिरंगा ध्वजाने बूट साफ केले जात होते. ही सगळं दृश्य पाहून मनात आग भडकत होती. तेव्हा आम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत यात्रा काढण्याचं ठरवलं. 26 जानेवारीला लालचौकात तिरंगा फडकविणार हे निश्चित झालं.

दहशतवाद्यांना हे कळाल्यानंतर श्रीनगरच्या प्रत्येक भिंतीवर पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यावर लिहिलं होतं की, जर कोणी आपल्या आईचं दूध प्यायलं असेल तर 26 जानेवारीला लाल चौकात तिरंगा फडकवून पुन्हा जिवंत जाऊन दाखवावं अशी धमकी दिली होती.त्यावेळी मी हैदराबादच्या सभेत मी 26 जानेवारीला सकाळी 11 वाजता श्रीनगरमधील लाल चौकात येणार आहे. मी बुलेटप्रूफ जॅकेट घालणार नाही किंवा बुलेटप्रुफ कारमधून येणार नाही. माझ्या हातात तिरंगा असेल. फैसला 26 जानेवारीलाच होईल असं सांगितलं. त्यानंतर मी ठरलेल्या दिवशी, दिलेल्या वेळेत लाल चौकात जाऊन तिरंगा फडकविला असं नरेंद्र मोदींनी सांगितले.   

 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतterroristदहशतवादी