शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चिनी ॲपद्वारे २५० कोटींचा गंडा, पैसे दुपटीच्या आमिषाने कृत्य; एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 06:21 IST

Chinese app : चीनच्या स्टार्टअप योजनेमधून पॉवर बँक अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. हे अ‍ॅप भारतामध्ये आतापर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे.

देहराडून/नोएडा : कमी वेळात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष हे फसवणुकीचे कारण ठरू शकते हे माहिती असूनही अनेक लोक या आमिषाला बळी पडतात. उत्तराखंड एसटीएफने २५० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी उत्तर प्रदेशमधील नोएडा येथून एका आरोपीला अटक केली. ही फसवणूक चीनमधील स्टार्टअप योजनेंतर्गत तयार झालेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून केवळ चार महिन्यांमध्ये करण्यात आली आहे.

चीनच्या स्टार्टअप योजनेमधून पॉवर बँक अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. हे अ‍ॅप भारतामध्ये आतापर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांना १५ दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जात असे. त्या माध्यमातून चार महिन्यांमध्ये या ठकसेनांनी २५० कोटी रुपयांचा चुना लोकांना लावला.

फसवणूक करणारे लोकांना १५ दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून पॉवर बँक अ‍ॅप डाउनलोड करायला सांगत. हा धंदा सुमारे चार महिने सुरू होता. पोलिसांना याची माहिती नव्हती. अखेर उत्तराखंडमधील हरिद्वार येथील एका व्यक्तीने केलेल्या तक्रारीनंतर या घटनेचा उलगडा झाला.

या प्रकरणी उत्तराखंड एसटीएफने नोएडा येथून पवन पांडेय याला अटक केली. त्याच्याकडून ५९२ सीमकार्ड, १९ लॅपटॉप आणि पाच मोबाइल फोन जप्त केेले. तपासात ही रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये बदलून परदेशात पाठविली जात असल्याचे समोर आले. या प्रकरणाची माहिती आयबी आणि रॉ या संस्थांनाही देण्यात आली आहे.

वेगवेगळ्या खात्यांत पैसेपॉवर बँक अ‍ॅप नावाच्या अ‍ॅपमध्ये १५ दिवसांत पैसे दुप्पट करण्यासाठी तक्रारदाराने दोन वेळा ९३ हजार ७२ रुपये जमा केले होते. मात्र, पैसे दुप्पट न झाल्याने पोलिसांत तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. तपासात हे पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा झाल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता तब्ब्ल २५० कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमChinese Appsचिनी ऍप