शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

18 जुलै रोजी दिल्लीत NDA चे शक्तिप्रदर्शन; शिवसेना-राष्ट्रवादीसह 19 पक्षांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 13:48 IST

NDA Meeting: 18 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत काही पक्ष एनडीएत सामील होण्याची शक्यता आहे.

NDA Leaders Meeting: लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. त्यामुळेच सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे विरोधक सरकारविरोधात एकवटत आहेत, तर दुसरीकडे भाजप आपली ताकत वाढवण्यावर भर देत आहेत. यातच आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 25 वर्षे पूर्ण झाल्यामुळे 18 जुलै रोजी राजधानीत एक मोठी बैठक बोलवण्यात आली आहे. 

विरोधकांच्या विरोधी ऐक्याला टक्कर देण्यासाठी भाजप एनडीएला मजबूत करण्यावर भर देत आहे. या बैठकीसाठी आतापर्यंत 19 राजकीय पक्षांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक लोकसभानिवडणूक 2024 साठी फार महत्वाची असणार आहे. 

NDA ची स्थापना 25 वर्षांपूर्वी मे 1998 मध्ये झाली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांना एनडीएचे पहिले अध्यक्ष बनवण्यात आले. सध्या भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एनडीएचे अध्यक्ष आहेत. स्थापनेपासून ममता बॅनर्जींच्या TMC, DMK, नॅशनल कॉन्फरन्स, JDU यासह सुमारे 41 राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचे NDA चे सदस्य होते. हळुहळू एनडीएकून अनेक पक्षांनी काढता पाय घेतला. सध्या एनडीएममध्ये सुमारे 20-21 पक्ष आहेत.

या पक्षांना निमंत्रण पाठवण्यात आले

  • चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (रामविलास गट)
  • उपेंद्र कुशवाह यांचा लोक समता पक्ष
  • जीतन राम मांझी यांचा हिंदुस्थान अवाम मोर्चा
  • संजय निषाद यांचा निषाद पक्ष
  • अनुप्रिया पटेल यांचा अपना दल (सोनेलाल)
  • जननायक जनता पार्टी (JJP)- हरियाणा
  • जनसेना- पवन कल्याण, आंध्र प्रदेश
  • AIMDMK - तामिळनाडू
  • तमिळ मनिला काँग्रेस
  • भारत मक्कल कालवी मुनेत्र कळघम
  • झारखंडचा AJSU
  • राष्ट्रवादी- कॉनरॅड संगमा
  • नागालँडचा NDPP
  • सिक्कीमचे एस.के.एफ
  • मिझो नॅशनल फ्रंट ऑफ झोरमथंगा
  • आसाम गण परिषद
  • सुहेलदेव भारतीय समाज पक्ष - ओमप्रकाश राजभर
  • शिवसेना (शिंदे गट)
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट)
टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेस