शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अग्नितांडव! गुजरातमध्ये पोलीस स्टेशन परिसरात भीषण आग, 25 गाड्या जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 9:01 AM

Fire News : गुजरातमधील खेडा शहरातील पोलीस स्टेशनच्या परिसरात रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली.

नवी दिल्ली - गुजरातमध्ये पोलीस स्टेशन परिसरात भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री लागलेल्या आगीत तब्बल 25 वाहने जळून खाक झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील खेडा शहरातील पोलीस स्टेशनच्या परिसरात रात्रीच्या सुमारास ही आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही. आग लागलेल्या वाहनांमध्ये दुचाकी, ऑटोरिक्षा आणि काही कारचा समावेश आहे. परिसरात प्रचंड धूर आणि आगीचे लोट पाहायला मिळाले. 

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. ही आग इतकी भीषण होती की, अवघ्या काही क्षणातच सर्वच्या सर्व वाहनांनी पेट घेतला आणि सर्व गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. 

नगरमध्ये रुग्णालयात अग्नितांडव, 11 मृत्युमुखी; मृतांमध्ये कोरोना रुग्णांचा समावेश

अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाला शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत कोरोनावर उपचार घेणाऱ्या ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांत चार महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. सहा रुग्ण जखमींवर उपचार सुरू आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.  गेल्या वर्षी कोरोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग सुरू केला होता. तेथे १७ रुग्ण उपचार घेत होते. आगीचे लोट पाहून रुग्णांच्या नातेवाईकांची  धावपळ उडाली. 

कर्मचारी व नातेवाईकांनी रुग्णांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तोपर्यंत रुग्ण भाजून गंभीर जखमी झाले होते. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ आग विझवली. रुग्णांना कक्षातून जवळच असलेल्या प्रसूती कक्षात हलविले. काही रुग्ण व्हेंटिलेटर तर काही ऑक्सिजनवर होते. आगीत ते जळून खाक झाले. रुग्णांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ अधिकाऱयांची समिती चौकशी करेल, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.  

टॅग्स :Gujaratगुजरातfireआग