शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 06:58 IST

धराली गावातील अनेक इमारती वाहून नेत सुमारे ८० एकरांहून अधिक भागांत गाळ पसरला असून स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार १०० ते १५० लोक यात दबले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री मार्गावरील प्रमुख शिबिर असलेल्या धरालीत मंगळवारी झालेल्या जलप्रलयानंतर अजूनही स्थिती अत्यंत बिकट आहे. भौगोलिक अडचणींमुळे या भागातील माती-दगडांचा गाळ काढून बेपत्ता लोकांचा शोध घेणे अत्यंत कठीण झाले आहे. धराली गावातील अनेक इमारती वाहून नेत सुमारे ८० एकरांहून अधिक भागांत गाळ पसरला असून स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार १०० ते १५० लोक यात दबले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सेन्सिंग उपकरणही अडकलेगाळात अडकून पडलेला कुणी जिवंत आहे का हे सांगणारे हायटेक थर्मल सेन्सिंग उपकरण तसेच मोठ्या मशीन अजूनही धरालीपासून ६० किमी अंतरावर भटवाडी भागात दोन दिवसांपासून अडकून पडल्या आहेत. या मशीन आणण्यासाठी असलेल्या रस्ते मार्गावर भूस्खलन झाल्याने ते बंद झाले आहेत. 

ते ३४ सेकंद ...मंगळवारी अवघ्या ३४ सेकंदात खीरगंगेतून प्रचंड वेगाने पाणी व गाळ वाहून आला आणि धराली गाव या गाळाने गिळंकृत केले. आतापर्यंत अधिकृतरीत्या ५ मृत्यूंना पुष्टी मिळाली असली तरी गाळात नेमके किती लोक दबले गेले आहेत, याची आकडेवारी सांगणे कुणालाच सध्या तरी शक्य नाही. 

नदी गाळाने तुंबलीउत्तरकाशीत ढगफुटीनंतर भागीरथी नदीला मिळणाऱ्या खीरगंगा नदीतून वेगवान प्रवाहाने वाहून आलेली माती व दगडांनी धराली गाव उद्ध्वस्त केलेच, शिवाय भागीरथीचे विस्तीर्ण पात्रही निम्म्याहून अधिक बुजवले. ‘इस्रो’ने प्रलयानंतर हे वास्तव सॅटेलाईटच्या माध्यमातून टिपले आहे. 

खीरगंगेने मूळ रूप घेतलेउपग्रहामार्फत टिपलेल्या या छायाचित्राचे निरीक्षण केले तर लक्षात येते की, धरालीच्या वस्तीमुळे ज्या खीरगंगा नदीचे पात्र अरुंद झाले होते त्या नदीने आता आपले क्षेत्र पुन्हा मिळवत मूळ रूप घेतले आहे. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडRainपाऊसDeathमृत्यूfloodपूर