शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

देशात पावसाचा कहर, 2391 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 09:27 IST

भारतात या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामध्ये 2391 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देभारतात या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामध्ये 2391 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आठ लाखांपेक्षाही अधिक घरांची हानी झाली पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे 15,729 जनावरे बेपत्ता झाली.

नवी दिल्ली - देशासह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनचा तडाखा नागरिकांना बसला आहे. भारतात या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामध्ये 2391 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मान्सूनमध्ये झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 2391 जणांना जीव गमवावा लागला आहे. यंदा जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकसभेत मंगळवारी (19नोव्हेंबर) याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मान्सूनमुळे देशातील 2391 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आठ लाखांपेक्षाही अधिक घरांची हानी झाली असल्याची  माहिती दिली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) 176 पथकांनी 98,962 नागरिकांची सुटका केली आणि देशातील 23,869 नागरिकांना वैद्यकीय मदत करण्यात आल्याची माहिती राय यांनी दिली आहे. पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे 15,729 जनावरे बेपत्ता झाली आणि 63,975 लाख हेक्टर जमिनीवरील पिकांना फटका बसला आहे. तसेच अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी  दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी 22 राज्यांमध्ये जवळपास 25 लाखांहून अधिक लोकांना पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. भूस्‍खलनच्या समस्येचाही सामना करावा लागला. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात 382 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पूर आणि वीज पडल्याने 227 जणांचा मृत्यू झाला. देशातील एकूण 357 जिल्ह्यांना यावर्षी पावसाळ्यात पूर व दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांचा सामना करावा लागला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे 738 लोक जखमी झाले. तर सुमारे 20 हजार जनावरे मृत्युमुखी पडली. पाऊस व पुरांमुळे 1.09 लाख घरे पडली आणि 2.05 लाख घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले. या पुरांमुळे तब्बल 14.14 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकेही नष्ट झाली होती

‘क्यार’, ‘महा’ आणि ‘बुलबुल’ अशी एकावर एक चक्रीवादळे येत असतानाच हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे यंदा ऑक्टोबरसह नोव्हेंबर महिन्यातही मुंबईत पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, सांताक्रुझ वेधशाळेत नोव्हेंबर 2019 च्या पहिल्याच दिवशी शहराच्या जवळच असलेल्या चक्रीवादळ ‘महा’मुळे 46 मिमी पावसाची नोंद झाली असून, 2010 नंतरचा हा जास्त पाऊस असलेला यंदाचा नोव्हेंबर महिना आहे. ऑक्टोबरच्या मध्यानंतर पाऊस कोसळत नाही. क्वचित हलक्या सरी कोसळतात. मात्र या वर्षी नोव्हेंबर महिन्यातही मुसळधार पाऊस कोसळला. सांताक्रुझ वेधशाळेत नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी शहराच्या जवळच असलेल्या चक्रीवादळ ‘महा’मुळे 46 मिमी पावसाची नोंद झाली.  

टॅग्स :RainपाऊसIndiaभारतlok sabhaलोकसभाDeathमृत्यू