UP Crime: उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यापासून राज्यातील गुन्हेगारांविरोधात यूपी पोलिसांची तीव्र कारवाई सुरुच आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, गुन्हेगारीबाबत 'झिरो टॉलरन्स' धोरणांतर्गत गुन्हेगार/गुन्हेगारांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई केली जात आहे. २०१७ पासून पोलिसांनी २३८ गुन्हेगारांना चकमकीत ठार केले आहे, तर ९ हजारांहून अधिक गुन्हेगार गोळीबारात जखमी झाले आहेत.
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ३० हजारांहून अधिक गुन्हेगारांना अटक करुन तुरुंगात पाठवले आहे. तर, ९,४६७ गुन्हेगारांच्या पायाला गोळ्या लागल्या. सर्वाधिक कारवाई मेरठ झोनमध्ये झाली.
योगी सरकार कायदा आणि सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या आठ वर्षांत यूपी पोलिस गुन्हेगारी आणि गुन्हेगारांविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरणांतर्गत सतत कारवाई करत आहेत. २०१७ पासून पोलिसांनी राज्यात ३० हजारांहून अधिक गुन्हेगारांना चकमकीनंतर अटक केली आहे, तर ९ हजारांहून अधिक गुन्हेगारांना चकमकीदरम्यान पायात गोळी लागली आहे. मेरठ झोनमध्ये सर्वाधिक ७९६९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली, तर २९११ जखमी झाले.
उत्तर प्रदेशचे डीजीपी राजीव कृष्णा म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार गुन्हेगारांवर सतत कारवाई केली जात आहे. गेल्या आठ वर्षांत, गुन्हेगारांना पकडण्यासाठी यूपी पोलिसांनी १४,९७३ कारवाई केल्या. या दरम्यान, ३०,६९४ गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले.
पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ९,४६७ गुन्हेगारांना पायात गोळी लागली, तर २३८ गुन्हेगार मारले गेले. राज्यातील सर्वाधिक कारवाई पश्चिमेकडील मेरठ झोनमध्ये करण्यात आली. येथे पोलिसांनी ७,९६९ गुन्हेगारांना अटक केली तर २,९११ जखमी झाले. त्याचप्रमाणे, आग्रा झोनमध्ये ५,५२९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली, तर ७४१ जखमी झाले. तर बरेली झोनमध्ये ४,३८३ गुन्हेगारांना पकडण्यात आले आणि ९२१ जखमी झाले. याशिवाय वाराणसी झोनमध्ये २०२९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आणि ६२० जखमी झाले.
एकूणच, उत्तर प्रदेशात सत्ता हाती घेताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पहिले ध्येय राज्यात कायद्याचे राज्य स्थापित करणे आणि गुन्हेगारांचा नाश करणे हे राहिले आहे.