काश्मिरात वर्षभरात २३० अतिरेकी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 06:32 IST2018-12-09T06:32:37+5:302018-12-09T06:32:58+5:30

काश्मीरच्या खोऱ्यामध्ये या वर्षभरात ठिकठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये विविध दहशतवादी संघटनांच्या एकूण २३० अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारले आहे.

230 terrorists killed in Kashmir this year | काश्मिरात वर्षभरात २३० अतिरेकी ठार

काश्मिरात वर्षभरात २३० अतिरेकी ठार

नवी दिल्ली : काश्मीरच्या खोऱ्यामध्ये या वर्षभरात ठिकठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये विविध दहशतवादी संघटनांच्या एकूण २३० अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारले आहे. तथापि, दगडफेकीच्या घटनांत अनेक स्थानिक नागरिक, पोलीस व जवान जखमी
झाल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाºयांनी दिली.

सुरक्षा दलाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, २५ जून ते १४ सप्टेंबर या काळात ८० दिवसांमध्ये ५१ अतिरेकी ठार झाले, तर १५ सप्टेंबर ते ५ डिसेंबर या ७५ दिवसांच्या काळात ८५ अतिरेकी चकमकींमध्ये मारले गेले. इतके दहशतवादी मारले गेले असले, तरी काश्मीर खोºयामध्ये आजही विदेशी अतिरेक्यांसह काश्मिरात एकूण २४० दहशतवादी सक्रिय आहेत.

Web Title: 230 terrorists killed in Kashmir this year