शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

विमानाने आलेल्यांपैकी २२७ जणांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 05:17 IST

वंदे भारत मोहीम; केंद्राने मुंबई उच्च न्यायालयाला दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना साथीमुळे विदेशात अडकलेल्या व वंदे भारत मोहिमेद्वारे विशेष विमानांतून मायदेशात परतलेल्या ५८,८६७ भारतीय नागरिकांपैकी फक्त २२७ जणांना म्हणजे ०.३८ टक्के लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता, अशी माहिती केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.

विदेशात अडकलेल्या भारतीयांना विमानाने परत आणताना एअर इंडियाने फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीत, असा आरोप या कंपनीचे वैमानिक देवेन कनानी यांनी एका याचिकेत केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. काठावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.

नागरी हवाई वाहतूक संचालनालयातर्फे मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, वंदे भारत मोहिमेद्वारे भारतात परतलेल्या नागरिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या केलेल्या चाचण्यांमध्ये काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. विमानातून प्रवास करताना हा संसर्ग झाला होता का याबद्दल ठोस पुरावे मिळालेले नाहीत. या मोहिमेद्वारे विशेष विमानातून भारतात येण्याआधी संसर्ग नसलेल्या व देशात परतल्यानंतर या विषाणूची बाधा झालेल्या प्रवाशांची राज्यवार माहिती सादर करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नागरी हवाई वाहतूक संचालनालय व एअर इंडिया यांना मंगळवारी दिला होता.

रुग्णांची संख्या मोठी असण्याची शक्यतावंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत विदेशातून महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा येथे परतलेल्या १८,८९६ भारतीय नागरिकांपैकी किती जणांना कोरोनाचा संसर्ग झाला याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या आणखी मोठी असण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद वैमानिक देवेन कनानी यांच्या वतीने अ‍ॅड. अभिलाष पण्णीकर यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या