विजचोरी करणारे २२ जण गजाआड
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:16+5:302015-02-14T23:50:16+5:30
विजचोरी करणारे २२ जण गजाआड

विजचोरी करणारे २२ जण गजाआड
व जचोरी करणारे २२ जण गजाआडमुंबई: गोवंडीच्या शिवाजीनगर, रफिकनगर, बैगनवाडी परिसरातील तब्बल २२ वीज चोरांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलिसांनी रिलायन्स कंपनीच्या अधिकार्यांच्या सहकार्याने केली. गेल्या काही दिवसांपासून गोवंडीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याजवळच असलेल्या म्हाडा वसाहतीमध्ये ही चोरी सुरु होती. याबाबत रिलायंस कंपनीकडे अनेक तक्रारी येत होत्या. त्यानुसार रिलायंन्सच्या अधिकार्यांनी पाळत ठेवली. त्यानंतर १२ फेब्रुवारीला रात्री शिवाजी नगर पोलिसांची मदत घेऊन याठिकाणी छापा घालण्यात आला. यावेळी येथील इमारत क्र. १३ मध्ये जाऊन तब्बल २२ वीजचोरांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. रिलायंन्स आणि शिवाजीनगर पोलिसांनी वीज चोरांविरोधातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.