शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

"22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 6:24 PM

Lok Sabha Election 2024 : छत्तीसगडमधील बस्तरमध्ये आयोजित प्रचार सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केले.

बस्तर : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपासह काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडचा दौरा केला. यावेळी देशातील 22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, असे राहुल गांधी म्हणाले. छत्तीसगडमधील बस्तरमध्ये आयोजित प्रचार सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केले.

या सभेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी 24 तास फक्त त्या 22 लोकांसाठी मदत करत असतात. तसेच, बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे, भागिदारी कमी होत आहे. प्रत्येक राज्यातील लोक तुम्हाला सांगतील की मुख्य मुद्दा बेरोजगारी आणि महागाईचा आहे.

याचबरोबर, यावेळी उपस्थित लोकांना राहुल गांधी यांनी विचारले की, तुम्ही कधी माध्यमांनी बेरोजगारी, महागाईवर बोलताना पाहिले आहे का? माध्यमे तुम्हाला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना समुद्राच्या तळाशी जाताना किंवा मंदिरात प्रार्थना करताना दाखवतील. प्रसारमाध्यमांना बेरोजगारी आणि महागाईशी काहीही देणेघेणे नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

"प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा 8500 रुपये देणार"आम्हाला तुमचे जीवन बदलायचे आहे, आम्हाला तुमची मदत करायची आहे. नरेंद्र मोदी उद्योजकांना पैसे देऊ शकतात तर काँग्रेस गरीबांना पैसे देऊ शकते. त्यामुळे आम्ही 'महालक्ष्मी' हे नवीन धोरण आणत आहोत. निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच अंमलबजावणी केली जाईल. दारिद्र्यरेषेखालील (BPL) आम्ही प्रत्येक कुटुंबातील एका महिलेची निवड करू आणि आमचे सरकार प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा 8500 रुपये देईल. तसेच आम्ही एका वर्षात महिलांना एकूण एक लाख रुपये देणार आहोत, असेही राहुल गांधी यांनी जनसभेला संबोधित करताना सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४chhattisgarh lok sabha election 2024छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०२४bastar-pcबस्तर