हृदयद्रावक! मुजफ्फरपूरहून दिल्लीला जाणा-या बसमध्ये लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 20:13 IST2018-05-03T18:31:08+5:302018-05-03T20:13:42+5:30
मुजफ्फरपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुजफ्फरपूरहून दिल्ली जाणा-या एका बसमध्ये आग लागली आणि पाहता पाहता या आगीत होरपळून 27 प्रवाशांचा मृत्यू झाला.

हृदयद्रावक! मुजफ्फरपूरहून दिल्लीला जाणा-या बसमध्ये लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू
बिहार- मोतीहारी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुजफ्फरपूरहून दिल्ली येथे जाणा-या एका बसमध्ये आग लागली आणि पाहता पाहता या आगीत होरपळून 27 प्रवाशांचा मृत्यू झाला. गुरुवारी संध्याकाळी ही घटना मोतिहारी येथे घडली आहे. बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरसह 32 प्रवासी होते. घटनास्थळी अनेक लोक उपस्थित असून, पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य राबवलं आहे.
प्रत्यक्षदर्शीच्या मते, भरधाव वेगातील बस जागेवरच उलटली आणि त्यानंतर बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी वेळच मिळाला नाही. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुजफ्फरपूर बस दुर्घटनेबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसेच ही आग एअर कंडिशनच्या कारणास्तव लागल्याची प्राथमिक माहिती नितीश कुमार यांनी दिली आहे. अपघातानंतर काही प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले आहे.
#SpotVisuals: Total 27 people have died due to fire in a bus, after it overturned, in Bihar's Motihari. pic.twitter.com/NtKsNa4e0v
— ANI (@ANI) May 3, 2018