२२... मालेवाडा... कर्जवसुली
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:34+5:302015-01-23T01:05:34+5:30
दुष्काळी परिस्थितीत पीककर्ज वसुलीचा तगादा

२२... मालेवाडा... कर्जवसुली
द ष्काळी परिस्थितीत पीककर्ज वसुलीचा तगादानागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक : शेतकऱ्यांना बजावल्या नोटीसमालेवाडा : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतीचा खर्च आणि प्रपंच चालविणे कठीण झाले आहे. त्यातच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीककर्ज वसुलीसाठी संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. सदर कर्जाची परतफेड १५ दिवसांच्या आत न केल्यास कारवाई करण्याचा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. भिवापूर तालुक्यातील मालेवाडा व परिसरातील शेतकऱ्यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जवळी शाखेतून पीककर्जाची उचल केली होती. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आजवर सदर बँकेकडून घेतलेल्या पीककर्जाचा नियमित भरणा केला आहे. गेल्या खरीप हंगामात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काही तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले नाही. ऐन पेरणीच्या काळात ही परिस्थिती उद्भवल्याने शेतकऱ्यांनी या बँकेकडून घेतलेल्या पीककर्जाची परतफेड केली. पीककर्जाचा भरणा केल्यानंतर नव्याने कर्ज मिळण्याची शाश्वती नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी हातचा पैसा सोडला नाही. काही शेतकऱ्यांनी यातून मार्ग काढत अन्य राष्ट्रीयीकृत बँकांकडून तर काहींनी सावकारांकडून कर्जाची उचल केली. यावर्षी प्रतिकूल वातावरणामुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले. कमी उत्पादन होऊनही सोयाबीनला कमी भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी व मिरचीकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यातच कपाशीवर लाल्या आणि मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने दोन्ही पिके उद्ध्वस्त झालीत. भिवापूर तालुक्यातील सोयाबीन, कपाशी व मिरची शिवाय तिसरे कोणतेही प्रमुख घेतले जात नसल्याने तसेच या तिन्ही पिकांवर प्रतिकूल वातारणाचा विपरीत परिणाम झाल्याने शेतातून घरी आलेल्या या पिकांचा उत्पादनखर्चही भरून निघाला नाही. कापसालाही यंदा चांगला भाव मिळत नाही. पावसाच्या लपंडावामुळे यावर्षी भिवापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. यातून सावरत शेतकऱ्यांनी पेरणी करून पिकांची चांगली मशागत केली. मात्र, समाधानकारक पीक हाती आले नाही. त्यात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीस पाठविल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. वास्तवात, भिवापूर तालुक्यात यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारीची (आणेवारी) अट आडवी येत असून,