२०२४च्या निवडणुका सनातनच्या मुद्द्यावर; भाजप देशभर अनेक योजना आखणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 09:14 AM2023-12-07T09:14:04+5:302023-12-07T09:14:36+5:30

तीन राज्यांत बहुमत मिळविल्यानंतर आता भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

2024 elections on Sanatan issue; BJP will plan many schemes across the country | २०२४च्या निवडणुका सनातनच्या मुद्द्यावर; भाजप देशभर अनेक योजना आखणार

२०२४च्या निवडणुका सनातनच्या मुद्द्यावर; भाजप देशभर अनेक योजना आखणार

संजय शर्मा

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष २०२४ मध्ये देशभरात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका सनातनच्या मुद्द्यावर लढवणार आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा आढावा घेताना सनातनचा मुद्दा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. 

तीन राज्यांत बहुमत मिळविल्यानंतर आता भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी दीर्घ चर्चा केली. ज्यामध्ये पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचाही आढावा घेण्यात आला.   सूत्रांचे म्हणणे आहे की, प्रत्येक राज्यात विजय-पराजयामागे वेगवेगळी कारणे होती.

सनातनचा एक मुद्दा होता ज्याने सर्व राज्यांमध्ये भाजपची मते वाढवण्यास मदत केली आणि हिंदू मतदारांना एकत्र केले. काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून जातनिहाय जनगणनेची मागणी होत आहे. त्यालाही हा मुद्दा जोरदार प्रत्युत्तर मानले जात आहे. काँग्रेस आधी जातीच्या नावावर, नंतर भाषेच्या नावावर आणि नंतर प्रादेशिकतेच्या नावाने फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आता सनातनच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच मुद्द्यावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनीही म्हटले आहे की, सनातनचा अपमान करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. आता त्यांचे नेते तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी प्रादेशिकवादावर बोलत आहेत. येत्या काही दिवसांत देशभरात सनातनला जागृत करून संघटित करण्यासाठी भाजप अनेक योजना आखणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: 2024 elections on Sanatan issue; BJP will plan many schemes across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.