सन २०२० मध्ये तब्बल ५,१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन; ३६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 09:07 AM2020-12-30T09:07:22+5:302020-12-30T09:17:13+5:30

सन २०२० मध्ये तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, गेल्या १८ वर्षांतील हा सर्वांधिक आकडा असल्याचे सांगितले जात आहे.

this 2020 year the highest ceasefire violation 5100 times | सन २०२० मध्ये तब्बल ५,१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन; ३६ जणांचा मृत्यू

सन २०२० मध्ये तब्बल ५,१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन; ३६ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देसन २०२० मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ५१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघनगेल्या १८ वर्षातील सर्वाधिक आकडा २००४ ते २००६ या दरम्यान गोळीबाराची एकही घटना नाही

जम्मू :भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण सीमेवर पाकिस्तानकडून या वर्षभरात म्हणजेच सन २०२० मध्ये तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२० मध्ये पाकिस्तानाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात ३६ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जवान शहीद झाले आहेत. तर, १३० जण जखमी झाले आहेत.

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २६ नोव्हेंबर २००३ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा करार करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षातील एकंदरीत आकडेवारी पाहता पाकिस्तानाकडून हा करार संपुष्टात आल्याचे पाहायला मिळत आहे, असे निरीक्षण नोंदवले जात आहे. सन २०२० मध्ये पाककडून तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, गेल्या १८ वर्षांतील हा सर्वांधिक आकडा असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षातील एकूण घटनांचा आढावा घेतल्यास सरासरी दिवसाला १४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे म्हटले जात आहे. 

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मूमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघनात पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात १५ जवान शहीद झाले. गेल्या वर्षी म्हणजेच सन २०१९ मध्ये पाकिस्तानाकडून ३ हजार २८९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यापैकी ऑगस्ट २०१९ नंतर तब्बल १ हजार ५६५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यापूर्वी २०१८ मध्ये २ हजार ९३६ वेळा, तर २०१७ मध्ये ९७१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. 

२००४ ते २००६ दरम्यान एकदाही गोळीबार नाही

शस्त्रसंधी कराराचा प्रभाव काही वर्ष दिसून आला. २००४ ते २००६ या कालावधीत सीमाभागात एकदाही शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले नाही. २००९ नंतर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ होत गेली. जम्मू, कठुआ, कुपवाडा, बारामुल्ला, सांबा, राजोरी, पूँछ जिल्ह्यात याचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळत आहे. सीमेवरील ग्रामीण भागातील नागरिकांना तीन वेळा आपले घर-दार सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला. 

दरम्यान, पाककडून होणाऱ्या गोळीबाराला भारतीय जवानांकडून वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देण्यात आले. जवानांच्या सुरक्षेसाठी १४ हजार ४०० बंकर तयार करण्यासाठी ४१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यापैकी ७ हजार ७७७ बंकर तयार असून, कठुआ, सांबा, जम्मू, राजोरी आणि पूँछ जिल्ह्यात उर्वरित बंकर तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

Web Title: this 2020 year the highest ceasefire violation 5100 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.