राज्यातील २० हजार प्रमुख लोक जाणार; बाबा रामदेव, जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 07:16 IST2023-11-14T07:16:33+5:302023-11-14T07:16:45+5:30

विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले की, येत्या दोन महिन्यांत संपूर्ण देशात ‘राममय’ वातावरण होईल. 

20 thousand prominent people of the state will go; Baba Ramdev, Jaggi Vasudev, Sri Sri Ravi Shankar will come | राज्यातील २० हजार प्रमुख लोक जाणार; बाबा रामदेव, जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर येणार

राज्यातील २० हजार प्रमुख लोक जाणार; बाबा रामदेव, जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर येणार

- संजय शर्मा

नवी दिल्ली : येत्या दोन महिन्यांत रा.स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील प्रत्येक गाव आणि शहरात अयोध्या अवतरण्यासाठी काम करतील. देशातील १० कोटी जनतेला अयोध्येला जाण्यासाठी आमंत्रित केले जाईल. फेब्रुवारी २०२४ मध्ये एकट्या महाराष्ट्रातील २० हजारांहून अधिक प्रमुख लोक अयोध्येला भेट देतील. विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले की, येत्या दोन महिन्यांत संपूर्ण देशात ‘राममय’ वातावरण होईल. 

४ हजार संतांना निमंत्रण
महंत नृत्य गोपालदासजी, बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर, सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासह देशातील चार हजारांहून अधिक साधू-संतांना निमंत्रण पाठविले जात आहे. 

Web Title: 20 thousand prominent people of the state will go; Baba Ramdev, Jaggi Vasudev, Sri Sri Ravi Shankar will come