20 विद्यार्थ्यांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू
By Admin | Updated: July 25, 2014 08:55 IST2014-07-25T03:00:12+5:302014-07-25T08:55:53+5:30
तेलंगणमधील एका मानवरहित रेल्वेफाटकावर पॅसेंजरची स्कूलबसला धडक बसून २० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.

20 विद्यार्थ्यांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू
हैदराबाद : तेलंगणच्या मेडक जिल्ह्याच्या मासायिपेट गावात एका मानवरहित रेल्वेफाटकावर नांदेड-सिकंदराबाद पॅसेंजरने गुरुवारी स्कूलबसला धडक दिली. या अपघातात २० विद्यार्थी व स्कूलबसचा चालक असे एकूण २१ जण ठार झाले. जखमी विद्याथ्र्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आह़े
तूपरस्थित एका खासगी शाळेचे ५ ते १५ वर्षे वयोगटातील सुमारे 4० विद्यार्थी स्कूलबसमध्ये होत़े नेहमीचा चालक सुटीवर असल्याने नवा चालक स्कूलबस चालवत होता़ शॉर्टकटच्या नादात त्याने मानवरहित रेल्वेक्रॉसिंगवरून जाण्याचा निर्णय घेतला व या निर्णयानेच घात केला़ अपघातानंतर स्कूलबस सुमारे २०० मीटर फरफटत गेली. तिचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता़ सर्वत्र विखुरलेल्या मुलांच्या स्कूलबॅगा, वॉटरबॅगा, जेवणाचे डबे, पुस्तके आणि पालकांचा आक्रोश असे मन हेलावणारे दृश्य या ठिकाणी होत़े या धडकेने रेल्वेचे कोणतेही नुकसान झाले नाही अथवा त्यातील प्रवाशांनाही इजा झाली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सदानंद गौडा आणि राज्याचे मुख्यमंत्री क़ेचंद्रशेखर राव यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आह़े (वृत्तसंस्था)
गौडा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख व किरकोळ जखमींना प्रत्येकी 2क् हजार रुपयांची मदत जाहीर केली आह़े
असा झाला अपघात
मासायिपेट व वादियाराम रेल्वे स्थानकांदरम्यान आज गुरुवारी सकाळी ९.१० वाजता हा अपघात झाला़
मासायिपेट मानवरहित रेल्वेक्रॉसिंगवर पार
करीत असताना नांदेड-सिकंदराबाद पॅसेंजरने या स्कूलबसला धडक दिली़
या धडकेत ८मुले आणि ६ मुली अशी १४ शाळकरी मुले तसेच बसचालक आणि क्लीनर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला; तर २० अन्य मुले जखमी झाली आहेत.