20 killed in road accident in Himachal Pradesh | हिमाचल प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 33 जणांचा मृत्यू 
हिमाचल प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 33 जणांचा मृत्यू 

शिमला (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशमधील कुल्लू येथे बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून, या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला असून, 37 जण जखमी झाले आहेत. कुल्लूमधील बंजार येथे हा अपघात झाला. 

ही बस कुल्लू येथून गाडागुशैणी येथे जात होती. दरम्यान, बंजार येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या भियोग मोठ जवळ ही बस 500 फूट खोल दरीत कोसळली. या बसमधून सुमारे 60 ते 70 जण प्रवास करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजल्यानंतर पोलिसांसोबत स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले.

हा अपघात इतका भीषण  होता की त्यात बसचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. दरम्यान, अपघातग्रस्त बसमधून 12 महिला, 6 मुली, 7 मुले आणि 10 तरुणांना बाहेर काढण्यात यश आले. यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. बचावलेल्या लोकांनी आपघाताचे वर्णन करताना आपले वाचणे हे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे सांगितले. 


Web Title: 20 killed in road accident in Himachal Pradesh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.