Reel बनवल्यानंतर पुढच्या ३० मिनिटांत २ युवकांचा मृत्यू; घरी पोहचण्याआधीच घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 14:35 IST2025-05-01T14:35:11+5:302025-05-01T14:35:36+5:30
हे सर्व युवक गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास स्कोर्पिओने घरी परतत होते. आदित्य गाडी चालवत होता.

Reel बनवल्यानंतर पुढच्या ३० मिनिटांत २ युवकांचा मृत्यू; घरी पोहचण्याआधीच घडली दुर्घटना
बिजनौर - शहरातील नगीना रोडवर वऱ्हाडी मंडळींवर अनियंत्रित वेगवान कार पलटली आहे. गाडी पलटल्यामुळे २ युवकांचा मृत्यू झाला असून अन्य ४ जखमी आहेत. मृत युवक आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. हे सर्व मित्राच्या लग्नात वऱ्हाडी म्हणून सहभागी झाले होते. त्यातील एक युवक चंदीगड येथे एमबीएचं शिक्षण घेत होता.
हा अपघात इतका भीषण होता की, वेगवान कार पलटी झाल्यानंतर शेजारील शेतात कोसळली. या २ युवकांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यात नातेवाईकांनी पोस्टमोर्टम न करताच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. बुधवारी रात्री गंधाशपूर येथील रहिवासी संजय यांची मुले ओम फार्म हाऊसवर लग्नासाठी गेले होते. हे सर्व युवक गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास स्कोर्पिओने घरी परतत होते. आदित्य गाडी चालवत होता. नगीना रोडवर बीकेआयटीजवळ पोहचतात त्यांची कार अनियंत्रित झाली.
कारचा वेग इतका होता की ती पलटल्यानंतर बाजूच्या शेतात जाऊन पडली. कारचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. कारमधील सगळ्यांना तात्काळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला नेले. जिथे देवांश आणि शिवांग यांना मृत घोषित करण्यात आले. अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवांग, शिवांग कारच्या मागील बाजूस बसले होते. लग्नाहून परतताना वेगवान कारमध्ये ते व्हिडिओ रिल बनवत होते. तो सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यानंतर ३० मिनिटांनी अपघातात युवकांचा मृत्यू झाला.