शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

2 Years of Modi 2.0: कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर जनता खूश, पण मोदी सरकारच्या कृषि कायद्यांबाबत वेगळा कौल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 13:08 IST

पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. यासाठी या सरकारला विरोधाचा सामनाही करावा लागला. पण याची फारशी तमा या सरकारने बाळगली नाही आणि आपले काम ठरलेल्या पद्धतीप्रमाणे सुरूच ठेवले. (2 Years of Narendra Modi government )

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी भाजपला एकहाती बहुमत मिळवून दिले. ते पंतप्रधान झाल्यापासून नेहमीच त्यांच्या कामाची तुलना काँग्रेसने केलेल्या 70 वर्षांच्या कामाशी करण्यात येते. मोदींनी त्यांच्या सात वर्षांच्या कार्य काळात अनेक मोठे, धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेतले. यांत काश्मिरचे कलम 370 हटविणे, नवे कृषी कायदे, सीएए, सर्जिकल आणि एअर स्ट्राइक, जीएसटी, नोटाबंदी आणि चीन विषयक धोरण, अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे. सध्या भजपही मोदी सरकारने गत सात वर्षांत केलेल्या कार्यांचा 'लेखा-जोखा' देशासमोर मांडत आहे. याच पार्श्वभूमीवर लोकमत डॉट. कॉमने मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासंदर्भात जनमताचा कौल घेतला आहे. (2 Years of Modi 2.0: People happy with the Modi government decision about 370, but a different opinion on the agricultural laws)

2 Years of Modi 2.0: २०२४ ला पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत का?; बघा, किती टक्के जनता म्हणते 'हो'

पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. यासाठी या सरकारला विरोधाचा सामनाही करावा लागला. पण याची फारशी तमा या सरकारने बाळगली नाही आणि आपले काम ठरलेल्या पद्धतीप्रमाणे सुरूच ठेवले. मात्र, या सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान उभे राहिले, ते कोरोना महामारीचे. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले. मात्र, दुसऱ्या लाटेत मोदी सरकारची हतबलताही दिसून आली. मोदी सरकारच्या याच टर्ममध्ये अयोध्येतील राम मंदिराचा तिढा सुटला, काश्मीरचे कलम 370 हटले, नवे कृषी कायदे तयार झाले आणि भारत-चीन संघर्षही झाला. 

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात कलम 370 हटविण्याचा निर्णय आणि नवे कृषी कायदे आणण्याचा निर्णय अत्यंत चर्चेत राहिला. देशात कृषी कायद्यांविरोधात तर गेल्या वर्षभरापासून आंदोलने सुरूच आहेत. लोकमत डट कॉमने यासंदर्भात जो जनमताचा कौल घेतला, त्यात 370 कलम हटविण्याचा सरकारचा निर्णय जनतेने योग्य ठरवला. मात्र, शेतकरी धोरणासंदर्भात लोक फोरसे समाधानी नाहीत, असे दिसून आले आहे. जाणून घेऊया, काय होते लोकमत डॉट कॉमनेचे प्रश्न आणि काय आहे जनतेचा कौल... 

2 Years of Modi 2.0: मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली की घटली?; वाचा, काय आहे जनमताचा कौल

लोकमत डॉट कॉमने विचारलेले प्रश्न -1. 370 कलम रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य वाटतो का? -लोकमतने विचारलेल्या या प्रश्नावर तब्बल 77.45 टक्के लोकांनी 'होय', असे उत्तर दिले आहे. 14.11 टक्के लोकांनी 'नाही', असे उत्तर दिले आहे. तर 8.44 टक्को लोकांनी 'माहीत नाही', असे उत्तर दिले आहे. कलम 370 हे जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम होते. हे कलम हटवून सरकारने जम्मू आणि काश्मीरचे, जम्मू-काश्मीर आणि लडाख, अशा दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केले आहे.

2. मोदी सरकारच्या काळात भारताने चीनला धडा शिकवला, असे वाटते का? -या प्रश्नावर 46.92 टक्के वाचकांनी 'नाही', असे उत्तर दिले, 40.64 टक्के लोकांनी 'होय', असे उत्तर दिले, तर 12.44 टक्के लोकांनी 'काही प्रमाणात' धडा शिकवला, असे उत्तर दिले आहे. आपल्या दुसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारला चीनच्या आव्हानाचाही  सामना करावा लागला. सरकारच्या याच कार्यकाळात गलवानमधील भारत-चीन सैन्यात हिंसक झटापट होऊन दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर आमनेसामने उभे ठाकले होते. याच काळात मोदी सरकारने चीनी व्यापार विषयक धोरनाच्या पार्श्वभूमीवरही अनेक मोठे निर्णय घेतले.

3. मोदी सरकारच्या शेतीविषयक कायद्यांविषयी तुमचे मत काय आहे? ते योग्य वाटतात का? -

लोकमत डॉट कॉमने विचारलेल्या या प्रश्नावर, 43.58 टक्के लोक 'होय' म्हणत आहेत, 47.55 टक्के लोक 'नाही' म्हणत आहेत, तर 8.87 टक्के लोक 'सांगता येत नाही' असे म्हणत आहेत.

4. राम मंदिराचे बांधकाम कधी पूर्ण होईल, असे वाटते? -लोकमतच्या या प्रश्नावर, 18.73 टक्के लोकांनी 2023 पर्यंत, 34.28 टक्के लोकांनी 2024 पर्यंत, 17.20 टक्के लोकांनी 2025 पर्यंत तर 29.79 टक्के लोकांनी 2030 पर्यंत असे उत्तर दिले आहे. मोदी सरकारच्या याच कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निकाल दिला आहे.

2 Years of Modi 2.0: लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता, पण कोरोना संकट हाताळण्यात....; पाहा जनमत चाचणीचा रिझल्ट

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतArticle 370कलम 370