२ ट्रक- कारचा विचित्र अपघात; ६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 09:00 IST2022-05-22T09:00:28+5:302022-05-22T09:00:55+5:30

एका ट्रकचा क्लिनर, दुसऱ्या ट्रकचा चालक व क्लिनर व कारमधील तीन लोकांचा मृत्यू झाला

2 truck-bizarre car accident; 6 killed | २ ट्रक- कारचा विचित्र अपघात; ६ जणांचा मृत्यू

२ ट्रक- कारचा विचित्र अपघात; ६ जणांचा मृत्यू

अहमदाबाद : गुजरातच्या मोडासा जिल्ह्यात आलमपूर गावाजवळ शनिवारी सकाळी दोन ट्रक आणि एका कारचा अपघात झाला. त्यानंतर तीनही वाहनांना आग लागली. यात सहा जणांचा जळून मृत्यू झाला. 

एका ट्रकचा क्लिनर, दुसऱ्या ट्रकचा चालक व क्लिनर व कारमधील तीन लोकांचा मृत्यू झाला. तर, कार चालकाने उडी मारुन जीव वाचविला. लोकांनी सांगितले की, दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि याचवेळी येथून जाणारी कारही त्यावर धडकली. एका ट्रकमध्ये केमिकल होते त्यामुळे तीनही वाहनांना आग लागली. घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमनच्या वाहनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला.

Web Title: 2 truck-bizarre car accident; 6 killed