चेन्नईतही मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून दोघांना बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 11:38 AM2018-07-02T11:38:25+5:302018-07-02T11:50:47+5:30

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन पाच जणांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता चेन्नईमध्येही असेच प्रकरण समोर आले आहे.

2 people were beaten by mob on suspicions of child theft in chennai | चेन्नईतही मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून दोघांना बेदम मारहाण 

चेन्नईतही मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून दोघांना बेदम मारहाण 

चेन्नई - महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन पाच जणांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता चेन्नईमध्येही असेच प्रकरण समोर आले आहे. मुलं पळवणारे असल्याच्या संशयातून संतप्त जमावानं दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघंही गंभीररित्या जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघंही चेन्नई मेट्रोमध्ये मजुरीचं काम करणारे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून व्हिडीओ फुटेजच्या आधारे दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. 

(धुळ्यात मुले पळवणारे समजून 5 जणांची हत्या)
 
दरम्यान, धुळे येथे किडनी काढण्यासाठी लहान मुले पळविणारी टोळी गावात आल्याच्या अफवेचे भूत डोक्यात संचारलेल्या ग्रामस्थांनी रविवारी (1 जुलै) साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील आठवडा बाजारात पाच जणांना जबर मारहाण करून ठार केले. हे सर्व जण ज्योतिष सांगून उपजीविका करणारे भटक्या समाजातील होते. ते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याहून आले होते. मारहाण करत या संशयितांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडण्यात आले. तेथेच जमावाने दगडाने ठेचून, लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण करीत त्यांना ठार मारले. दादाराव शंकर भोसले (४५), भारत शंकर भोसले (४५), राजू भोसले (४५), भारत माळवे (४७, सर्व रा. खवे ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) आणि आगनू भोसले (२२, रा. मानेवाडी ता. मंगळवेढा) यांना दगड व काठ्यांनी ठेचून क्रूरपणे मारले. याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 
 

...आणि अशी पसरली अफवा !
आठवडे बाजारात सकाळी साडेअकराच्या सुमारास आदिवासी महिला भविष्य सांगणाºया एका व्यक्तीला हात दाखवित होती. त्या वेळेस काही तरुण तेथे आले. त्यांनी ज्योतिष सांगणाºया व्यक्तीची विचारपूस केली. घाबरून त्याने उलटसुलट उत्तरे दिली. हे सुरू असतानाच तेथे गर्दी झाली. गर्दीतील काहींनी ‘हे’ लहान मुलांना पळवून नेऊन त्यांच्या किडन्या काढून विकतात, असा आरोप केला. मग वातावरण चिघळले. काही तरुणांनी ‘त्या’ व्यक्तीला मारण्यास सुरुवात केली. त्याला वाचविण्यासाठी काही लोक आले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु हे सर्व आपल्या परिसरातील नसल्याचे पाहून ग्रामस्थ आणखी संतापले. त्यांनी सर्वांना मारहाण केली.


धुळ्याच्या घटनेची मालेगावातही पुनरावृत्ती
धुळ्याच्या घटनेची पुनरावृत्ती नाशिकमधील मालेगावातही झाली.  मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून मालेगावात संतप्त जमावाने 5 जणांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आझाद नगर परिसरात रविवारी (1 जुलै) ही घटना घडली आहे. मुले पळवणारी टोळी समजून परभणी जिल्ह्यातील दोघांना जमावाकडून जबर मारहाण करण्यात आले. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गजानन साहेबराव गिरे आणि सिंधूबाई साहेबराव गिरे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.  दरम्यान, आणखी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी शहरात मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा रात्री पसरताच जमाव अधिक आक्रमक झाला होता. जमावाने पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड केली. याममुळे मालेगावात नाशिकहून अधिक पोलिसांची कुमक मागवण्यात आली. यावेळी  जमावावर सौम्य लाठीचार्जही करण्यात आला.

Web Title: 2 people were beaten by mob on suspicions of child theft in chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.