अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 11:54 IST2025-05-04T11:54:07+5:302025-05-04T11:54:57+5:30

ही निर्णायक कारवाई असून येणाऱ्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. 

2 Pakistani spies arrested in Amritsar; leaked confidential information of Indian Army | अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक

अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक

नवी दिल्ली - पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी ISI निगडीत २ गुप्तहेरांना अटक केली आहे. पलाक शेर मसीह आणि सूरज मसीह असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप दोघांवर आहे. या दोन्ही आरोपींनी भारतीय सैन्याची छावणी, एअरबेस आणि अन्य संवेदनशील क्षेत्राचे फोटो, माहिती शत्रू देशाला दिल्याचं तपासात उघड झाले आहे. ही सर्व माहिती जेलमध्ये बंद गँगस्टर हरप्रीत सिंग उर्फ पिट्टूच्या हॅप्पी नेटवर्कच्या माध्यमातून ISI पाठवली जात होती.

पंजाब पोलिसांनुसार, अटकेतील आरोपींचं गुप्तहेर नेटवर्क असू शकते, जे सोशल मीडियावर बनावट कागदपत्राच्या आधारे सैन्य ठिकाणांवर पोहचून तिथली गोपनीय माहिती गोळा करत होते. या प्रकरणी Official Secrets Act अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी या दोघांच्या अटकेची बातमी पोस्ट केली आहे. पंजाब पोलिस देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या कुठल्याही किंमतीत सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. ही निर्णायक कारवाई असून येणाऱ्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. 

या दोन आरोपींनी पाकिस्तानला काय काय माहिती दिली, त्यामागे त्यांचा हेतू काय होता या सर्व प्रकाराची चौकशी पोलीस करत आहेत. त्याशिवाय या गुप्तहेरांचे नेटवर्क शोधण्याचं काम पोलीस करत आहे. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह यांच्याकडे अमृतसर येथील वायू सेनेच्या ठिकाणांची संवेदनशील माहिती आणि फोटो मिळाले आहेत. प्राथमिक तपासात या दोघांचा संबंध पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI शी असल्याचं उघड झाले आहे. 

POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश

दरम्यान, भारतीय सैन्याच्या संभाव्य कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानने POK मध्ये बंकर खोदकाम सुरू केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना घरे खाली करण्यास सांगून तिथे सैन्य चौकी बनवली जात आहे. युवकांना हत्यारांचे ट्रेंनिग देणे सुरू झाले आहे पाकिस्तानी सैन्याने POK मध्ये गुप्त बंकर तयार केलेत. सर्वसामान्य लोकांच्या घरांवर कब्जा करून तिथे सैन्य छावणी उभारली जात आहे. गिलगित-बालिस्टानच्या युवकांना शस्त्रे चालवण्याचं प्रशिक्षण दिले जात आहे. 

Web Title: 2 Pakistani spies arrested in Amritsar; leaked confidential information of Indian Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.