शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghodbunder Traffic Update: गायमुख घाट उतरणीवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत ११ वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी
2
"CM फडणवीसांनी शेजारच्या खुर्च्यांवर कोण बसलंय ते बघावं"; भीती संगम म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
4
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
5
WPL 2026 Opening Ceremony : हरमनप्रीत अन् स्मृती मैदानात उतरण्याआधी या बॉलिवूडकरांचा दिसणार जलवा
6
पगारवाढ हवी असेल तर ऑफिसला यावंच लागेल; TCS चा कडक पवित्रा, 'WFO' अटेंडन्स पूर्ण नसल्यास अप्रेझल रखडणार
7
Social Viral: कोण म्हणतं पाणीपुरी विकणं छोटं काम आहे? तापसीने करून दाखवलं 'वर्ल्ड रेकॉर्ड'
8
'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...', जयंत पाटील यांची बोचरी टीका
9
२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख
10
Nashik Municipal Election 2026 : सभांचा धडाका; ठाकरे बंधू आज; उद्या शिंदे, रविवारी मुख्यमंत्री; फोडाफोडीचा मुद्दा गाजणार
11
जगात 'या' ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त चांदी; भारतापेक्षा तब्बल 40 हजार रुपयांनी स्वस्त...!
12
बापानं किडनी देऊन वाचवलं, कर्जाचा डोंगर उपसून उपचार केले; पण त्याच मुलानं आयुष्य संपवलं
13
लालू परिवाराच्या अडचणीत वाढ! 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून दोषारोप निश्चित; आता खटला चालणार
14
एका चुकीच्या क्लिकने 'आयुष्यभराची कमाई' साफ; सायबर भामट्यांनी चलानच्या नावाखाली लुटले ३.६ लाख
15
देशातील पहिली फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंगवाली कार ट्रकमध्ये घुसली; मध्य प्रदेशच्या माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू 
16
सरेंडर व्हायला किती वेळ लागतो? मैत्री एका बाजूला म्हणत राज ठाकरेंचा फडणवीस-शिंदेंवर घणाघाती प्रहार
17
Rahul Gandhi : "भ्रष्ट जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
बजाज-अलायन्झचा २४ वर्षांचा प्रवास संपला! संजीव बजाज यांची 'मास्टरस्ट्रोक' डील; आता पूर्ण मालकी भारतीयांकडे
19
'मोदींनी ट्रम्प यांना फोनच केला नाही,आता अमेरिका...'; व्यापार करारावर अमेरिकेच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा
20
एसबीआय, बँक ऑफ इंडिया की बँक ऑफ बडोदा... सर्वात स्वस्त Home Loan कोण देतंय? ६० लाखांवर किती ईएमआय?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात मतदारयाद्यांतून वगळली २.८९ कोटी नावे; SIR चा जबर दणका; प्रत्येक पाचवा मतदार यादीतून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 09:59 IST

आता ६ फेब्रुवारीपर्यंत याबाबतचे दावे-आक्षेप नोंदवून घेतले जातील आणि ६ मार्च रोजी अंतिम मतदारयादी जाहीर केली जाईल.

राजेंद्र कुमार, लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ : उत्तर प्रदेशातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात (एसआयआर) निवडणूक आयोगाने सुमारे २.८९ कोटी नावे मतदारयाद्यांतून वगळली आहेत. मंगळवारी मसुदा याद्या जाहीर झाल्यानंतर वगळलेली नावे स्पष्ट झाली. आता ६ फेब्रुवारीपर्यंत याबाबतचे दावे-आक्षेप नोंदवून घेतले जातील आणि ६ मार्च रोजी अंतिम मतदारयादी जाहीर केली जाईल.

राज्यात पुनरिक्षणापूर्वीच्या याद्यांत मतदारांची संख्या १५.४४ कोटी होती. ही संख्या एकदम १२.५५ कोटींवर आली आहे. या मूळ याद्यांतून २,८८,७४,१०८ नावे वगळण्यात आली आहेत. कुणाचे नाव मसुदा यादीतून नजरचुकीने वगळले गेले असेल तर दावे-आक्षेप नोंदवून दुरुस्ती करता येऊ शकेल, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी म्हटले आहे. फटका कोणत्या पक्षाला

राज्यात दीर्घकाळ सुरू राहिलेल्या मतदारयाद्यांच्या पुनरिक्षण प्रक्रियेचा हा फटका नेमक्या कोणत्या राजकीय पक्षाला बसेल याची चर्चा सुरू झाली असून या प्रक्रियेमुळे आगामी काळातील निवडणुकांची दिशा निश्चित होणार आहे. याचा सर्वाधिक फटका भाजपला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

भाजपला फटका बसण्याची कारणे

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांनी वगळलेल्या नावांपैकी बहुतांश भाजप समर्थक असल्याचे म्हटले होते. यावर पक्षात आता विचारमंथन सुरू झाले आहे. कारण, दीर्घकाळ सुरू राहिलेल्या या प्रक्रियेत भाजपचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्ते आपल्या समर्थकांचे अर्ज भरू शकले नाहीत. विशेष म्हणजे आयोगाने दोन वेळा यासाठी मुदत वाढवली होती. 

ममतांचा गंभीर आरोप 

पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेत निवडणूक आयोग भाजपच्या आयटी विभागाने तयार केलेल्या मोबाईल ॲपचा अनधिकृत वापर करीत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणूक आयोग एसआयआर प्रक्रियेदरम्यान "सर्व प्रकारचे चुकीचे मार्ग" अवलंबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

क्रिकेटपटू मोहम्मद शमी याला एसआयआर पडताळणी सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु तो विजय हजारे ट्रॉफीत व्यग्र  असल्याने उपस्थित राहू शकला नाही. 

खा. ओब्रायन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

एसआयआरच्या प्रक्रियेतील अनियमिततेविरुद्ध तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ते म्हणाले "निवडणूक आयोग मनमानीपणे किंवा कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन काम करू शकत नाही."

काँग्रेस नेते गुरदीपसिंग सप्पल यांनी उत्तर प्रदेशातील मतदारयादीतून आपल्या सर्वच कुटुंबीयांची नावे गायब झाल्याचा दावा केला. 

आसाममधील मसुदा मतदारयादीत गंभीर अनियिमतता असल्याचा दावा काँग्रेस नेते व राज्यातील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांनी केला.

प. बंगालमध्ये एसआयआरबाबत सर्वाधिक ६१ हजार दावे भाजपने दाखल केले आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : UP Voter Lists Trimmed: Millions Removed Amid SIR Concerns

Web Summary : Uttar Pradesh's voter lists shed 2.89 crore names after a special revision. Objections are open until Feb 6, with a final list on March 6. Political parties allege irregularities, with concerns raised in West Bengal and the Supreme Court.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग