एकीकडे बहिणीची पाठवणी, दुसरीकडे २ भावांची चिता जळाली; लग्न घरावर कोसळला दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:08 IST2025-02-06T12:07:50+5:302025-02-06T12:08:12+5:30
ही धडक इतकी भीषण होती युवकांच्या डोक्याला खांब जोरात लागला आणि जागीच दोघांचा मृत्यू झाला.

एकीकडे बहिणीची पाठवणी, दुसरीकडे २ भावांची चिता जळाली; लग्न घरावर कोसळला दु:खाचा डोंगर
फिरोजाबाद - उत्तर प्रदेश जिल्ह्यातील फिरोजाबाद इथं बहिणीच्या लग्नात निघालेल्या २ भावांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती घरच्यांना कळताच कुटुंबात शोककळा पसरली. कसे तरी लग्न उरकून टाकले. सकाळी घरात एकीकडे मुलीची पाठवणी सुरू होती तर दुसरीकडे २ भावांच्या अंत्यसंस्काराची तयारी होत होती. या घटनेमुळे संपूर्ण गावात सगळेच हळहळले, लग्नाच्या घरातही सन्नाटा पसरला होता.
फिरोजाबाद येथील २२ वर्षीय दीपक कुमार हा चुलत भाऊ प्रशांत कुमारसह त्याच्या आत्याच्या मुलीच्या लग्नात सहभागी व्हायला निघाले होते. ते बाईकवरून अवागडच्या दिशेने जात असतानाच वाटेत फतेहपुरच्या वळणावर त्यांचं बाईकवरील नियंत्रण सुटले आणि बाईक रस्त्याकिनारी असलेल्या एका विद्युत खांबाला आदळली. ही धडक इतकी भीषण होती युवकांच्या डोक्याला खांब जोरात लागला आणि जागीच दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी युवकांची ओळख पटवून त्यांच्या घरच्यांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोन्ही युवकांचे मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलला गर्दी केली. लग्नासाठी येणाऱ्या तरुणांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. युवकांच्या आई वडिलांचे रडून रडून हाल झाले. यावेळी घरातील ज्येष्ठांनी मुलीचं लग्न उरकून घेऊन अंत्यसंस्कार करावेत असं सूचवले. त्यानंतर सकाळी मृत युवकांच्या बहिणीचं लग्न करून तिची पाठवणी केली त्यानंतर युवकांचे मृतदेह घरी आणले. एकाच घरात लग्न आणि अंत्यसंस्काराची तयारी झाल्याने गावातही सन्नाटा पसरला. प्रत्येकाच्या डोळ्यात या घटनेमुळे अश्रू आले होते.