नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी सपा आणि बसपाने आघाडीची घोषणा केल्याने उत्तर प्रदेशात नव्या राजकीय समीकरणांची मांडणी झाली आहे. या आघाडीमुळे 2014 साली उत्तर प्रदेशात दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. सपा आणि बसपाने आघाडी करून निवडणूक लढवण्याची पहिलीच वेळ नाही. याआधी राम मंदिराचे राजकारण ऐन बहरात असतानाही सपा आणि बसपाने आघाडी करून भाजपाला पराभूत करण्याची किमया साधली होती. दरम्यान, सध्याही मतांची आकडेवारी आणि जातीय समीकरण या पक्षांच्या बाजूने असल्याने मायावती आणि अखिलेश यादव यांची बुआ-बबुआची जोडी कोणती कमा दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 25 वर्षांपूर्वी राम मंदिर आंदोलनादरम्यान बाबरी मशिदीचा विध्वंस झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील कल्याण सिंह सरकार बरखास्त करण्यात आले होते. तसेच राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी सपाचे मुलायम सिंह यादव आणि बसपाचे तत्कालीन सर्वेसर्वा काशीराम यांनी 1993 मध्ये विधानसभेसाठी आघाडी केली होती. या आघाडीने राम मंदिर आंदोलनामुळे उधळलेल्या भाजपाच्या वारूला लगाम घालून पराभूत केले होते. त्यावेळी 422 जागा असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत सपाला 109, बसपाला 67 तर भाजपाला 177 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी सपा आणि बसपा आघाडीला 29.06 टक्के मते मिळाली होती. तर भाजपाला 33.3 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर जनता दलाचा पाठिंबा घेऊन सपा-बसपाने सरकार स्थापन केले होते. ''मिले मुलायम-कांशीराम, हवा हो गए जय श्रीराम'' हा नारा तेव्हा उत्तर प्रदेशात प्रसिद्ध झाला होता. दरम्यान, उत्तर प्रदेशातील राजकीय इतिहासात कुप्रसिद्ध झालेल्या गेस्ट हाऊस प्रकरणानंतर ही आघाडी मोडीत निघाली. तसेच सपा आणि बसपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये हाडवैर निर्माण झाले होते.
त्यावेळी सपा-बसपा आघाडीने उडवली होती भाजपाची दाणादाण, आता असे असेल मतांचे गणित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 17:16 IST
लोकसभा निवडणुकीसाठी सपा आणि बसपाने आघाडीची घोषणा केल्याने उत्तर प्रदेशात नव्या राजकीय समीकरणांची मांडणी झाली आहे. मात्र सपा आणि बसपाने आघाडी करून निवडणूक लढवण्याची पहिलीच वेळ नाही.
त्यावेळी सपा-बसपा आघाडीने उडवली होती भाजपाची दाणादाण, आता असे असेल मतांचे गणित
ठळक मुद्देसपा आणि बसपाने आघाडीची घोषणा केल्याने नव्या राजकीय समीकरणांची मांडणी झाली आहेसपाचे मुलायम सिंह यादव आणि बसपाचे तत्कालीन सर्वेसर्वा काशीराम यांनी 1993 मध्ये विधानसभेसाठी आघाडी केली होती. या आघाडीने राम मंदिर आंदोलनामुळे उधळलेल्या भाजपाच्या वारूला लगाम घालून पराभूत केले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 2014 प्रमाणे मतदान झाले तरी भाजपाला अर्ध्याहून अधिक जागांवर पाणी सोडावे लागणार आहे.