२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार, केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:21 IST2025-12-05T12:19:42+5:302025-12-05T12:21:47+5:30

Indians deported by the United States: पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, मानवी तस्करीच्या प्रकरणांची चौकशी राज्यांनी तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केली आहे.

18,822 Indians deported from US since 2009, central government informed Parliament | २००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार, केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार, केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती

नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार केले. यात जानेवारी २०२५ पासून हद्दपार केलेल्या ३,२५८ भारतीयांचा समावेश आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितले.

पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, मानवी तस्करीच्या प्रकरणांची चौकशी राज्यांनी तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केली आहे. यात पंजाबमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 

२००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. २०२३ मध्ये ६१७ भारतीयांना आणि २०२४ मध्ये १,३६८ भारतीयांना हद्दपार करण्यात आले, असे मंत्र्यांनी सांगितले. जानेवारी २०२५ पासून अमेरिकेने एकूण ३,२५८ भारतीय नागरिकांना हद्दपार केले आहे. यापैकी २,०३२ भारतीय (अंदाजे ६२.३ टक्के) नियमित व्यावसायिक उड्डाणांनी परतले आणि उर्वरित १,२२६ भारतीय (३७.६ टक्के) यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) किंवा कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी) द्वारे चालवल्या जाणाऱ्या चार्टर विमानांनी परतले, असे ते म्हणाले.

पूरक प्रश्नांना उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, एनआयएने काही वर्षांपूर्वी मानव तस्करी विरोधी सेलची स्थापना केली होती. राज्यांनी अशा प्रकरणांची चौकशीदेखील सुरू केली आहे. एनआयएने मानवी तस्करीच्या २७ प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवले आहेत आणि तपास केला आहे, ज्यामुळे १६९ जणांना अटक करण्यात आली आहे. 

 

Web Title : 2009 से अमेरिका ने 18,822 भारतीयों को निर्वासित किया: केंद्र सरकार

Web Summary : 2009 से अमेरिका ने 18,822 भारतीय नागरिकों को निर्वासित किया, जिसमें जनवरी 2025 से 3,258 शामिल हैं। विदेश मंत्री जयशंकर ने राज्यसभा को बताया कि मानव तस्करी के मामलों की जांच राज्यों और एनआईए द्वारा की जाती है, जिसमें पंजाब में सबसे अधिक मामले दर्ज किए गए हैं। एनआईए ने 27 मामलों में 169 लोगों को गिरफ्तार किया है।

Web Title : US deported 18,822 Indians since 2009, Centre informs Parliament.

Web Summary : Since 2009, the US has deported 18,822 Indian citizens, including 3,258 since January 2025. External Affairs Minister Jaishankar informed Rajya Sabha that human trafficking cases are investigated by states and NIA, with Punjab reporting the highest number of cases. NIA has arrested 169 people in 27 cases.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.