शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

188 पाकिस्तानी हिंदूंना मिळालं भारताचं नागरिकत्व? अमित शाह म्हणाले, CAA वरून मुस्लिमांना भडकावलं गेलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 15:47 IST

अमित शाह म्हणाले, CAA संदर्भात मुस्लिमांना भडकावण्यात आले. CAA कायदा कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी (18 ऑगस्ट) CAA अंतर्गत 188 पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व बहाल केले. यासंदर्भात अहमदाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी लोकांनाही संबोधित केले. यावेली शाह म्हणाले, "फाळणी झाली तेव्हा बांगलादेशात 27 टक्के हिंदू होते, मात्र आज केवळ 9 टक्के शिल्लक आहेत. एवढे हिंदू शेजारील देशातून कुठे गेले? आम्ही 2019 मध्ये CAA घेऊन आलो. CAA मुळे कोट्यवधी हिंदू, जैन आणि शीख समाजाच्या लोकांना नागरिकत्व मिळेल."

अमित शाह म्हणाले, CAA संदर्भात मुस्लिमांना भडकावण्यात आले. CAA कायदा कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही. काही राज्य सरकारे CAA बाबत लोकांची दिशाभूल करत आहेत. I.N.D.I.A. आणि काँग्रेस CAA बाबत निर्वासितांची दिशाभूल करत आहेत.

काँग्रेसनं तुष्टीकरणाचं राजकारण केलं, आश्वासन पाळलं नाही -अमित शाह पुढे म्हणाले, "काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे स्वातंत्र्यानंतर शेजारील देशांतून आलेल्या छळ झालेल्या हिंदू, बौद्ध आणि शीखांना न्याय मिळाला नाही. आश्वासन देऊनही या लोकांना भारताचे नागरिकत्व मिळाले नाही. अशा कोट्यवधी लोकांना नरेंद्र मोदींनी न्याय दिला आहे."

"मी माझ्या सर्व निर्वासित बांधवांना आवाहन करतो की, आपण कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता नागरिकत्वासाठी अर्ज करा. आपल्यासोबत काहीही चुकीचे होणार नाही. यामध्ये कोणत्याही फौजदारी खटल्याची तरतूद नाही, तुमचे घर, तुमची नोकरी, सर्व काही अबाधित राहील. विरोधक तुमची दिशाभूल करत आहेत," असेही शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहHinduहिंदूPakistanपाकिस्तानBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी