शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Fake Inspector: 180 किलोच्या बनावट इंस्पेक्टरला अटक; टोल टॅक्स वाचवण्यासाठी घालायचा पोलिसांची वर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 17:27 IST

सध्या सोशल मीडियावर एका बनावट पोलीस इंस्पेक्टरचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एका बनावट पोलीस इंस्पेक्टरचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. पोलिसांची वर्दी घालून वावरणाऱ्या या बनावट इंस्पेक्टरचे नाव मुकेश यादव आहे, जो मूळचा उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा रहिवासी असून टोल टॅक्स वाचवण्यासाठी पोलिसांची वर्दी घालायचा. एवढेच नाही तर तो व्यक्ती बनावट पोलीस बनून वाहन चालकांकडून अवैध वसुली देखील करायचा. हा प्रकार स्थानिक तुंडला पोलिसांना कळताच त्यांनी तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे वजन तब्बल 180 किलो असल्याचा पोलिसांचा दावा आहे. आता त्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण? तुंडला पोलीसचे अधिकारी हरिमोहन सिंग यांनी रविवारी सांगितले की, शनिवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर अनेक वाहनांमधून अवैध वसुली झाल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर या व्यक्तीला अवैध वसुली करताना रंगेहाथ पकडण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली. बनावट इंस्पेक्टर बनून राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या वाहनांकडून त्यांना धमकावून आणि वाहने जप्त करण्याची धमकी देऊन त्यांची अवैध वसुली करत असल्याचे सांगण्यात आले. टोल टॅक्स वाचवण्यासाठी तो पोलिसांची वर्दी घालून हा प्रताप करत होता. 

वाहनांकडून करायचा अवैध वसुलीलक्षणीय बाब म्हणजे आरोपी मुकेशकडून दोन आधारकार्ड, दोन पॅनकार्ड, पोलिसांची वर्दी, बनावट आयकार्ड, एटीएम आदी कागदपत्रांशिवाय एक वॅगनआर कारही जप्त करण्यात आली आहे. त्यावर 'पोलीस' अशा आशयाचे मोठे स्टिकर देखील लावण्यात आले होते. यादरम्यान त्याचे दोन साथीदारही होते, ज्यांच्या मदतीने तो खासगी बस आणि ट्रक तपासण्याच्या नावाखाली अवैध वसुली करायचा. पोलीस अधिकारी हरिमोहन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची चौकशी सुरू आहे. त्याच्या टोळीत किती लोक सामील आहेत, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtollplazaटोलनाकाArrestअटक