गुजरातमध्ये बसच्या अपघतात 18 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 19:52 IST2019-09-30T19:52:06+5:302019-09-30T19:52:21+5:30
गुजरातमधील बनासकंठा जिल्ह्यातील अंबाजी तीर्थस्थानाजवळ एका बसचा अपघात झाला आहे.

गुजरातमध्ये बसच्या अपघतात 18 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी
गुजरातमधील बनासकंठा जिल्ह्यातील अंबाजी तीर्थस्थानाजवळ एका बसचा अपघात झाला आहे. तसेच या अपघातात आतापर्यत 18 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी असल्याचे समोर आले आहे. मुसळधार पावसामुळे बस घसरुण त्रिशुलिया घाटजवळ उलटली असल्याचे स्थानिक पोलिस निरिक्षक अजीत राजीयण यांनी सांगितले.
SG Shah, Additional District Health Officer on bus accident in Banaskantha, Gujarat: Death toll has risen to 18 https://t.co/ZbhGD6vtoS
— ANI (@ANI) September 30, 2019
अपघात झाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसखाली अडकलेल्या लोकांना काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.