शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजी व्यापारी रातोरात झाला तब्बल 172 कोटींचा मालक; कुटुंबीयांची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 17:55 IST

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे.

गाझीपूर : उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे भाजीचा व्यवसाय करणारा व्यक्ती रातोरात कोट्यवधींचा मालक बनला. प्राप्तिकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्यावर ही बाब व्यावसायिकाच्या लक्षात आली. खरं तर नोटीस मिळाल्यानंतर व्यावसायिकाच्या कुटुंबीयांची झोपच उडाली. नोटीस मिळाल्यानंतर तो गोंधळला आणि कोणीतरी आपली फसवणूक केली असून आपल्या कागदपत्रांचा गैरवापर करून खाते उघडून त्यात पैसे जमा केल्याचा आरोप केला. 

प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्यानंतर झाला खुलासा दरम्यान, विनोद रस्तोगी यांचे कुटुंब गाझीपूर जिल्ह्यातील सेवाराई भागातील गहमर गावात राहते. विनोद रस्तोगी हे त्यांच्या परिसरात भाजीचा व्यवसाय करतात. विनोद रस्तोगी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आयकर विभागाने नोटीस बजावली असून तुमच्या खात्यात 172 कोटींहून अधिक रुपये जमा आहेत असे सांगण्यात आले. प्राप्तिकर विभागाकडून नोटीस मिळाल्यानंतर विनोद यांना धक्काच बसला. प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या नोटीसनंतर ते बँकेत गेले असता त्यांच्या नावाने आणि आधार क्रमांकाने दुसरे खाते उघडण्यात आल्याचे आढळून आले. त्या खात्यात 172 कोटी 81 लाख 59 हजार 153 रुपये जमा आहेत. 

आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्याने आणि बँकेत जाऊन माहिती घेतल्यानंतर व्यापारी आणि त्यांचे कुटुंबीय अस्वस्थ झाले. व्यावसायिकाचे म्हणणे आहे की, हे खाते दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डसह इतर कागदपत्रांचा गैरवापर करून उघडले आहे. बँकेत जमा केलेला पैसा त्यांच्या मालकीचा नसून या पैशाशी त्याचा काहीही संबंध नाही. आता हे प्रकरण पोलिसांत पोहचले असून पोलीस ठाण्यातून सायबर सेलमध्ये पाठवण्यात आले. मात्र, सायबर सेलमध्येही मदत झाली नसल्याचे या व्यावसायिकाचे म्हणणे आहे. न्याय मिळवण्यासाठी संबंधित व्यावसायिक पोलीस ठाणे आणि सायबर सेलच्या चकरा मारत आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIncome Taxइन्कम टॅक्सCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस