स्विमिंग पूलमधून बाहेर आला अन् कोसळला, 17 वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 06:56 PM2024-06-23T18:56:11+5:302024-06-23T18:57:15+5:30

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

17-year-old boy dies of heart attack after coming out of swimming pool | स्विमिंग पूलमधून बाहेर आला अन् कोसळला, 17 वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू...

स्विमिंग पूलमधून बाहेर आला अन् कोसळला, 17 वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू...


मेरठ- उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा अचानक मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसते की, तो मुलगा स्विमिंग पूलच्या बाहेर येतो अन् धाडकन कोसळतो. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 21 जूनची आहे. 17 वर्षीय मुलगा स्विमिंग पूलमध्ये पोहणे झाल्यावर बाहेर आला. काही पाऊले चालल्यानंतर अचानक खाली कोसळला. हे पाहून आजूबाजूचे लोक त्याच्या मदतीसाठी धावले आणि त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली.

एसपी कमलेश बहादूर यांनी सांगितले की, अद्याप कुटुंबाकडून कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. पोलीस आपल्या बाजूने तपास करत असून, घटनेनंतर लगेचच जलतरण तलाव बंद करण्यात आला आहे. 

व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू
गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये जिममध्ये व्यायाम करताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. हा तरुण जिम करत असताना अचानक जमिनीवर कोसळला अन् काही सेकंदात त्याचा मृत्यू झाला. त्या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Web Title: 17-year-old boy dies of heart attack after coming out of swimming pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.