शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पुढील निवडणुकीत ईव्हीएम 'आऊट', बॅलट पेपर 'इन'? 17 पक्ष मतपत्रिकेसाठी आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 20:08 IST

17 राजकीय पक्ष निवडणूक आयोगाची भेट घेणार

नवी दिल्ली: देशातील सर्व राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली असताना, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देशातील 17 पक्ष निवडणूक आयोगाची भेट घेऊन पुढील निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर केला जावा, अशी मागणी करणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची भेट घेतली. त्यामध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीदेखील या मुद्यावर भर दिला होता. पुढील निवडणुकीत मतदानासाठी मतपत्रिकेचा वापर करण्यात यावा अशी मागणी समाजवादी पक्ष निवडणूक आयोगाकडे करेल, असं त्यावेळी रामगोपाल यादव म्हणाले होते. निवडणूक आयोगानं मागणी मान्य न केल्यास पक्ष धरणं आंदोलन करेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. निवडणूक आयोगावर दबाव आणण्यासाठी इतर पक्षांची मदत घेण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं यादव म्हणाले होते. पुढील निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर व्हावा यासाठी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय वायएसआर काँग्रेस, डीएमके, जेडीएस, टीडीपी यांच्यासह डाव्या पक्षांनीही अनेकदा मतपत्रिकेचा आग्रह धरला आहे. विशेष म्हणजे भाजपाचा मित्र असलेल्या आणि राज्यात सत्तेत राहूनही वारंवार भाजपावर शरसंधान साधणाऱ्या शिवसेनेनंही मतपत्रिकेची मागणी केली आहे.  

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी