शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे २४ तासांत १७ जणांचा मृत्यू, अहमदाबाद-सुरत महामार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 10:34 IST

३१ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

अहमदाबाद : देशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. महाराष्ट्राशिवाय गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तसेच केरळ या राज्यांना पावसाचा तडाखा असला आहे. त्यातही गुजरातमध्येपूरस्थिती अतिशय गंभीर असून, गेल्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाने १७ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद-सुरत महामार्ग बंद करण्यात आला असून, त्यामुळे मुंबई व नागपूरला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पूर आणि भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये जून महिन्यापासून देशभरात २२१ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातच्या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. आतार्यंत ३१ हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. एकट्या गुजरातमध्येच गेल्या चार दिवसांमध्ये ८३ जणांचा अतिवृष्टीमुळे  वलसाड, नवसारी, डांग, जूनागड, साेमनाथ हे या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. नवसारीमध्ये वांसडा तालुक्यात गेल्या २४ तासांमध्ये ४०० मिलिमीटर पाऊस झाला. या ठिकाणी अनेक भागात गुडघाभर पाणी आहे. पुरामुळे मुंबई-अहमदाबाद आणि नागपूर-सूरत महामार्ग बंद करण्यात आला आहे. वलसाडमध्ये कापरादा आणि धर्मापूर तालुक्यात ३५० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. 

अहमदाबादजवळ तीन महिलांचा मृत्यूअहमदाबाद शहराजवळ ओगनाज भागात सुरक्षा भिंत कोसळून दोन महिला मजूर व एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर पाच महिला जखमी झाल्या आहेत. या महिला तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये राहत होत्या. 

मध्य प्रदेशमध्ये नर्मदा धोक्याच्या पातळीवरमध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत ६६ जणांचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. राजधानी भोपाळमध्ये २२ इंच पावसाची नोंद झाली आहे. सर्वसामान्य प्रमाणापेक्षात ११ इंच जास्त पाउस या ठिकाणी झाला आहे. इंदूरमध्येही गेल्या २४ तासांत ३ इंच पाउस पडला आहे. 

राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट जारीराजस्थानमध्ये बांसवाडा, झालावाड, भीलवाडा, अलवर इत्यादी जिल्ह्यांमध्ये ४ ते ५ इंच पावसाची नोंद झाली. सिरोही आणि उदयपूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कर्नाटकमध्ये ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तेलंगणामध्ये शाळा, महाविद्यालयांना १६ जुलैपर्यंत सुट्टीतेलंगणामध्येही मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांची सुट्टी १६ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये टिहरी जिल्ह्यात गंगा नदीमध्ये ४ जण वाहून गेले. 

टॅग्स :GujaratगुजरातfloodपूरRainपाऊस