याच महिन्यात ठरणार भाजपचे १६४ उमेदवार; बारामती, नागपूरसह महाराष्ट्रातील अर्धा डझन जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 01:06 PM2024-01-11T13:06:57+5:302024-01-11T13:09:07+5:30

विरोधकांमधील नेमके कोणाला घ्यायचे हे विनोद तावडे ठरवणार

164 BJP candidates will be in this month; Half a dozen places in Maharashtra including Baramati, Nagpur | याच महिन्यात ठरणार भाजपचे १६४ उमेदवार; बारामती, नागपूरसह महाराष्ट्रातील अर्धा डझन जागा

याच महिन्यात ठरणार भाजपचे १६४ उमेदवार; बारामती, नागपूरसह महाराष्ट्रातील अर्धा डझन जागा

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भाजप या महिन्यात लोकसभा निवडणुकीसाठीच्या १६४ जागांसाठी उमेदवार जाहीर करू शकतो. यामध्ये महाराष्ट्रातील बारामती, नागपूरसह अर्धा डझन जागांवरील नावांचा समावेश आहे. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी या महिन्यात येण्याची शक्यता आहे. यापैकी १६० जागा गेल्या निवडणुकीत गमावलेल्या असतील. चार जागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ, अमित शाह यांचा गांधीनगर मतदारसंघ, राजनाथ सिंह यांचा लखनौ आणि  नितीन गडकरी यांचा नागपूर यांचा समावेश असू शकतो. राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक कधीही बोलावली जाऊ शकते. ज्यामध्ये या १६४ जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होईल.

विरोधकांमधील नेमके कोणाला घ्यायचे हे विनोद तावडे ठरवणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी  भारतीय जनता पक्षात इतर पक्षातील मोठे नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश करण्याची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली असून कंगना रनौत, अक्षय कुमार, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह देशातील १०० बड्या व्यक्ती आणि नेत्यांचा भाजपमध्ये समावेश करण्यात येणार आहे. छानणी आणि प्रवेश याची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे आहे.

सन्मान निधी १२,०००?

  • अर्थसंकल्पात महिला शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम वार्षिक ६,००० रुपयांवरून १२,००० रुपयांपर्यंत वाढू शकते.
  • मोदी सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी निधीमध्ये वाढ केली आहे.


महाराष्ट्रात ३० जागां लढवणार

गेल्यावेळी भाजपने महाराष्ट्रात २५ जागा लढविल्या होत्या. यावेळी भाजप ३० जागा लढवणार आहे. नागपूर, बारामती, चंद्रपूर, औरंगाबादसह ६ जागांसाठी उमेदवारांची घोषणाही याच महिन्यात होऊ शकते. 

  • २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४३६ जागा लढवल्या होत्या आणि ३०३ जागा जिंकल्या होत्या. 
  • १३३ जागांवर भाजप थेट पराभूत झाला होता आणि २७ जागांवर युतीच्या साथीदारांसह निवडणुकीत पराभूत झाला होता. 
  • १६० जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. 
  • ४५ केंद्रीय मंत्री, १०० हून अधिक खासदार आणि नेत्यांना १६० जागांची जबाबदारी देऊन आधीच तयारी सुरू झाली आहे.

 

Web Title: 164 BJP candidates will be in this month; Half a dozen places in Maharashtra including Baramati, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.