भयंकर! पालकांनी अभ्यास करण्यास सांगितलं पण 'तिने' टोकाचं पाऊल उचललं; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 17:44 IST2022-04-21T17:42:47+5:302022-04-21T17:44:51+5:30
16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याने पालकांना मोठा धक्का बसला आहे.

भयंकर! पालकांनी अभ्यास करण्यास सांगितलं पण 'तिने' टोकाचं पाऊल उचललं; नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली - आई-वडील नेहमीच आपल्या मुलांना अभ्यास करण्याचा सल्ला देतात. त्याचं चांगलं व्हावं हाच त्यांचा उद्देश असतो. पण असं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांनी मुलीला अभ्यास करायला सांगितलं होतं पण तिने टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
राजस्थानमधील गांधी नगर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना घडली आहे. 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याने पालकांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मा मीणा (16) असं या मुलीचं नाव असून ती शिव कॉलनीत राहत होती. अकरावीत शिकत असलेल्या या विद्यार्थिनीला बुधवारी दुपारी तिच्या आई-वडिलांनी अभ्यासाला बसायला सांगितलं तर जेवल्यानंतर ती खोलीत निघून गेली. काही वेळानंतर जेव्हा आई-वडिलांनी खोलीत पाहिलं तर त्यांच्या मुलीने गळफास घेतला होता. तिला खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आलं. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
कर्माच्या मृत्यूने कुटुंबाला जबर धक्का बसला. कुटुंबीयांनी जर तिला काही त्रास होता तर तिने कोणालाही का सांगितलं नाही, हा सवाल उपस्थित केला जात आहे. नेहमीप्रमाणे तिच्या आई-वडिलांनी मुलीला अभ्यासाला बसायला सांगितलं होतं. यातून तिने हे धक्कादायक पाऊल उचललं. तिने असं का केलं, याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.