चाकूचे १६ वार केल्याने अवयव पोटाबाहेर लटकले; दिल्ली हत्याप्रकरणी शवविच्छेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 06:32 IST2023-06-05T06:32:20+5:302023-06-05T06:32:36+5:30

रुग्णालयाकडून शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला असून त्यात हत्येचे भयानक वर्णन केले आहे.

16 stab wound left organs hanging out of abdomen autopsy in delhi murder case | चाकूचे १६ वार केल्याने अवयव पोटाबाहेर लटकले; दिल्ली हत्याप्रकरणी शवविच्छेदन

चाकूचे १६ वार केल्याने अवयव पोटाबाहेर लटकले; दिल्ली हत्याप्रकरणी शवविच्छेदन

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नवी दिल्लीत शाहबाद डेअरी परिसरात २८ मे रोजी आरोपी साहिलने अल्पवयीन मुलीवर चाकूने १६ वार केले होते. त्यानंतर त्या मुलीचे पोटातील अवयव बाहेर लटकले होते, अशी धक्कादायक माहिती १७ पानांच्या शवविच्छेदन अहवालात दिली आहे.

रुग्णालयाकडून शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला असून त्यात हत्येचे भयानक वर्णन केले आहे. यात म्हटले आहे की, साहिलचे हल्ले इतके गंभीर आणि क्रूर होते की, पीडितेचे आतड्यांसह अंतर्गत अवयव बाहेर आले. दरम्याम, पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू आणि बूट जप्त केले असून, ते तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. आरोपीला दिल्ली पोलिसांनी २९ मे रोजी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरजवळ अटक केली होती. घटनेच्या सीसीटीव्हीमध्ये साहिलने मुलीवर चाकूने अनेक वेळा वार केल्याचे दिसते.

दगडाने डोके फोडले 

- आरोपी साहिलने तिच्यावर अनेक वेळा चाकूने वार केल्याचे आणि नंतर दगडाने तिचे डोके फोडल्याचे अहवालात उघड झाले आहे. पीडितेच्या शरीरावर चाकूच्या अनेक जखमा होत्या. 

- डोक्यातील काही हाडांना भेगा आणि जखमाही आढळल्या आहेत. तिच्या शरीरातील अनेक हाडे तुटलेल्या अवस्थेत आढळून आल्याने हत्येचा निर्दयीपणा दिसून येतो, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

 

Web Title: 16 stab wound left organs hanging out of abdomen autopsy in delhi murder case

टॅग्स :delhiदिल्ली