१६... गुन्हे
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:13+5:302015-02-16T21:12:13+5:30
अवैध दारू विक्रेत्यास पकडले

१६... गुन्हे
अ ैध दारू विक्रेत्यास पकडलेनांद : भिवापूर पोलिसांनी रविवारी दुपारी केलेल्या कारवाईमध्ये अवैध दारू विक्रेत्यास पकडले. त्याच्याकडून दारूच्या ९५ बाटल्या जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. राकेश पत्रू डांगे (२४, रा. गदगाव, चिमूर, जिल्हा चंद्रपूर) असे कारवाई करण्यात आलेल्या अवैध दारू विक्रेत्याचे नाव आहे. पोळगाव शिवारातून दारूच्या बाटल्यांची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती भिवापूर पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी या शिवारात जाऊन राकेशकडे असलेल्या बॅगची कसून तपासणी केली. त्यात दारूच्या ९५ बाटल्या आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत बाटल्या जप्त केल्या. या दारूची किंमत ५,७०० रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास हवालदार संजय पायक व शिपाई गजघाटे करीत आहे. (वार्ताहर)***पशुवैद्यकीय दवाखान्यात चोरीखापरखेडा : स्थानिक शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात चोरट्यांनी हात साफ करीत १९,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. खापरखेड्यापासून दोन कि.मी.अंतरावर दक्षिणेला शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना आहे. चोरट्यांनी या दवाखान्याच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि आत ठेवलेला कॅमेरा, कूलर, स्टोव्ह यासह अन्य साहित्य घेऊन पळ काढला. या साहित्याची किंमत १९,७०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर घटनेचा तपास सहायक फौजदार मिश्रा करीत आहे. (प्रतिनिधी)***काटोल येथे चोरीकाटोल : स्थानिक लक्ष्मीनगरात चोरी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यात चोरट्यांनी १३०० रुपये किमतीचा एवज चोरून नेला. फिर्यादी सतीश गुलाब पुंजे (५०, रा. लक्ष्मीनगर, काटोल) हे बाहेरगावी गेले असता, चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यात चोरट्यांनी घरातील चांदीचे साहित्य चोरून नेले असून, त्या साहित्याची किंमत १३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी काटोल पोलिसांनी भादंवि ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.***