शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

भारत-रशिया यांच्यात १६ करार

By admin | Updated: October 16, 2016 01:09 IST

भारत आणि रशिया यांनी अनेक मोठ्या संरक्षण करारांवर शनिवारी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार भारत रशियाकडून क्षेपत्रास्त्र यंत्रणेची खरेदी करेल. तसेच दोन्ही देश

बेनॉलिम (गोवा) : भारत आणि रशिया यांनी अनेक मोठ्या संरक्षण करारांवर शनिवारी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार भारत रशियाकडून क्षेपत्रास्त्र यंत्रणेची खरेदी करेल. तसेच दोन्ही देश मिळून फ्रिगेटस् आणि लष्करी हेलिकॉप्टरांचे संयुक्तरीत्या उत्पादन करतील. याशिवाय विविध क्षेत्रांतील सहकार्य आणखी मजबूत करण्याचा तसेच दहशतवादाचा संयुक्तपणे मुकाबला करण्याचा निर्णयही दोघांनी घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी व्यापक चर्चा केल्यानंतर दोन्ही देशांनी एकूण १६ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. याशिवाय तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. दोन्ही नेत्यांनी कुडनुलम अणुऊर्जा प्रकल्पातील एका युनिटचे लोकार्पण केले. लष्करी करारानुसार भारत रशियाकडून गेमचेंजर एस-४00 ट्रायंफ हवाई सुरक्षा यंत्रणा विकत घेणार आहे. तिची किंमत ५ अब्ज डॉलर आहे. दोन्ही देश मिळून ४ अत्याधुनिक फ्रिगेटची बांधणी करणार आहेत, तसेच कामोव्ह हेलिकॉप्टरसाठी निर्मिती प्रकल्प उभारणार आहेत. पुतीन यांच्या उपस्थितीत मोदी यांनी यासंबंधीचे निवेदन केले. भारताने सीमापार दहशतवादाच्या मुद्यावर केलेल्या कृतीला दिलेल्या समर्थनाबद्दल मोदी यांनी रशियाची प्रशंसा केली. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकच्या अनुषंगाने हे वक्तव्य मोदी यांनी केले. मोदी यांनी सांगितले की, दहशतवाद आणि त्याला पाठिंबा याबाबत ‘शून्य सहनशीलता’ धोरणाचा आम्ही दोघांनीही पुनरुच्चार केला आहे. पुतीन म्हणाले की, दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या बाबतीत दोन्ही देशांचे घनिष्ट सहकार्य आहे. (वृत्तसंस्था)एस्सार आॅईलचे अधिग्रहण- रशियन सरकारच्या मालकीची कंपनी रॉसनेट व तिच्या भागीदारांनी भारतातील सर्वांत मोठी तेल कंपनी एस्सार आॅईलचे १३ अब्ज डॉलरला अधिग्रहण केले आहे. हा व्यवहार रोखीने झाला आहे.