आई किचनमध्ये, आजी-आजोबा खोलीत; कार्टून पाहणाऱ्या चिमुकल्यासोबत घडलं आक्रित अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 11:13 IST2024-01-29T11:12:07+5:302024-01-29T11:13:05+5:30

15 महिन्यांचा भाचा आयुष शनिवारी संध्याकाळी घरात इतर मुलांसोबत टीव्हीसमोर बसला होता. त्याचे आजी आजोबा त्यांच्या खोलीत होते, तर आई स्वयंपाकघरात काम करत होती.

15 month old child died due to drowning in bucket in faridabad | आई किचनमध्ये, आजी-आजोबा खोलीत; कार्टून पाहणाऱ्या चिमुकल्यासोबत घडलं आक्रित अन्...

आई किचनमध्ये, आजी-आजोबा खोलीत; कार्टून पाहणाऱ्या चिमुकल्यासोबत घडलं आक्रित अन्...

हरियाणाच्या फरिदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे घराच्या बाथरूममध्ये पाण्याच्या बादलीत बुडून एका 15 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं की, मुलगा घरातील इतर लहान मुलांसोबत टीव्हीवर कार्टून पाहत होता आणि त्यानंतर थोड्यावेळाने अचानक बाथरूममध्ये पोहोचला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरीदाबादमधील एका घराच्या बाथरूममध्ये 15 महिन्यांच्या मुलाचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाला. मुलगा टीव्हीवर कार्टून पाहत होता आणि नंतर त्याचा मृतदेह बादलीत सापडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्या कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे. 

इंदिरा कॉलनीतील रहिवासी असलेल्या रमनने सांगितलं की, त्यांचा 15 महिन्यांचा भाचा आयुष शनिवारी संध्याकाळी घरात इतर मुलांसोबत टीव्हीसमोर बसला होता. त्याचे आजी आजोबा त्यांच्या खोलीत होते, तर आई स्वयंपाकघरात काम करत होती. तेव्हा आयुष अचानक इतर मुलांना सोडून बाथरूममध्ये गेला. 

कुटुंबीय मुलाचा शोध घेण्यासाठी बाथरूममध्ये गेले असता त्याचं डोकं पाण्याच्या बादलीत बुडलेलं आढळून आलं. आयुषला ताबडतोब बाहेर काढलं आणि खासगी रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी रविवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
 

Web Title: 15 month old child died due to drowning in bucket in faridabad