शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

१५ लाख कोटींचे राष्ट्रीय महामार्ग अन् खादीला जागतिक बाजारपेठ मिळवून देणार - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 3:27 AM

माझ्या खात्यांनी खर्च केलेल्या १७ लाख कोटी रकमेतील ११ लाख कोटी रुपये एकट्या राष्ट्रीय महामार्गांच्या बांधणीवर खर्च झाले आहेत.

नवी दिल्ली : आगामी काळात १५ लाख कोटी रुपये खर्चाचे राष्ट्रीय महामार्ग बांधणीचे प्रकल्प हाती घेण्याचा केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा विचार आहे, तसेच खादी, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांच्या उत्पादनांचा जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचेही त्यांनी ठरविले आहे.

नितीन गडकरी हे आता त्यांच्याकडे असलेल्या खात्याचे सलग दुसऱ्यांदा मंत्रीपद भूषवत आहेत. गडकरी म्हणाले की, देशात राष्ट्रीय महामार्ग कशा प्रकारे बांधायचे याचा आराखडा तयार आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या आगामी प्रकल्पात २२ ग्रीन एक्स्प्रेसवेज आहेत. जे प्रकल्प काही कारणाने रखडले आहेत, त्यांना येत्या १०० दिवसांत चालना देण्यात येईल. एनडीए सरकारच्या पहिल्या कार्यकाळात माझ्याकडे भूपृष्ठ वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग, जलस्रोत, गंगा शुद्धीकरण, अशा खात्यांचा भार होता. त्यावेळी माझ्या खात्यांनी खर्च केलेल्या १७ लाख कोटी रकमेतील ११ लाख कोटी रुपये एकट्या राष्ट्रीय महामार्गांच्या बांधणीवर खर्च झाले आहेत.

प्रकल्पांमधील अडचणी अजून कायमनितीन गडकरी म्हणाले की, लोकसभा निवडणुकांत मतदारांनी पक्ष, जात-पात, धर्म, जातीयवाद यांच्या भिंती ओलांडून मतदान केले. नरेंद्र मोदी यांना सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसविले. भ्रष्टाचार करणाºया तसेच काळा पैसा बाळगणाºयांना मोदी सरकारने नोटाबंदी करून इशारा दिला. केंद्र सरकारने गृहबांधणी, स्वयंपाकाचा गॅस, वीज, आरोग्य तपासणी आदींसंदर्भात राबविलेल्या योजनांमुळे सामान्य जनतेला मोठा फायदा झाला. देशामध्ये विविध कारणांनी २२५ प्रकल्प अडकून राहिले होते. त्यातील अडचणी दूर केल्या आहेत. फक्त २० ते २५ प्रकल्पांमधील अडथळे दूर करणे बाकी आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग