दोन अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:42 IST2018-04-07T01:42:56+5:302018-04-07T01:42:56+5:30

दोन अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू

 15 deaths in two accidents | दोन अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू

दोन अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू

नालगोंडा - तेलंगणा राज्यातील नालगोंडा जिल्ह्याच्या वड्डिपटला गावाजवळ शुक्रवारी एक ट्रॅक्टर अलिमिनेटी माधव रेड्डी प्रकल्पाच्या कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात नऊ महिला ठार झाल्या. त्यापैकी आठ जणींची ओळख पटली आहे. अन्य २0 जणांना वाचवण्यात पोलीस व स्थानिक रहिवाशांना यश आले आहे. त्यातील काहींना बराच मार लागला असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून ३० शेतमजूर प्रवास करत होते. ते सर्व पद्मावती थंडा गावातील रहिवासी होते आणि पुलिचेरा येथे रोजंदारीच्या कामावर निघाले होते. क्षमतेपेक्षा जास्त लोक या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेले होते. त्यातील काही जणांना स्वत:चा जीव वाचविण्याची संधीदेखील मिळाली नाही. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ट्रक चहाच्या स्टॉलमध्ये घुसल्याने ६ जणांचा बळी
पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. ६वर साहाचल्क गावानजीक एक ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या स्टॉलमध्ये घुसला. त्यामुळे स्टॉलमध्ये चहा पीत बसलेले सहा जण ठार व बारा जण जखमी झाले. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानंतर ट्रक चहाच्या स्टॉलमध्ये घुसला.

Web Title:  15 deaths in two accidents