१५... गुन्हे.. जोड...०१

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:22+5:302015-02-15T22:36:22+5:30

९५ हजारांचा ऐवज पळविला

15 ... crime ... attachment ... 01 | १५... गुन्हे.. जोड...०१

१५... गुन्हे.. जोड...०१

हजारांचा ऐवज पळविला
वाडी : चोरट्यांनी कारच्या काचा फोडून आत ठेवलेली बॅग पळविली. त्यात ९५ हजार रुपये किमतीचे साहित्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी वळणावर शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
फिर्यादी प्रशांत रामराव रामटेके (३१, रा. यादवनगर, कामठी रोड, नागपूर) हे एमएच-३१/सीपी-२३६२ क्रमांकाच्या कारने जात होते. दरम्यान, त्यांनी ही कार एमआयडीसी वळणावर असलेल्या अनिल चाट मिष्ठान्न भंडारसमोर उभी केली आणि ते कार लॉक करून नाश्ता करण्यासाठी निघून गेले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारचा डावीकडील काच फोडला आणि आत ठेवलेली बॅग घेऊन पळून गेला. त्या बॅगमध्ये कॅमेरा, सेल, चार्जर, मेमरी कार्ड, कॅमेरा क्लीन किट आदी साहित्य ठेवले होते. त्या साहित्याची एकूण किंमत ९५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी वाडी पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कावनपुरे करीत आहेत. (प्रतिनिधी)
***
भरधाव ट्रकची दुचाकीला धडक
तरुणाचा मृत्यू : ब्राम्हणी येथील अपघात
कळमेश्वर : परस्पर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना कळमेश्वर नजीकच्या ब्राम्हणी येथील आरामशीनसमोर शनिवारी रात्री ७.१५ वाजताच्या सुमारास घडली.
कुणाल कैलास तागडे (१९, रा. खापरी, ता. कळमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश धनराज मेहूनकर (२२, रा. खापरी-मेंढे, ता. कळमेश्वर) व अमरदीप तागडे (२२, रा. घोगली-टाम्पा, ता. कळमेश्वर) अशी जखमींची नावे आहेत. कुणाल, आकाश आणि अमरदीप हे तिघेही एमएच-४०/एई -८१७१ क्रमांकाच्या दुचाकीने कळमेश्वर-सावनेर मार्गावरून कळमेश्वरकडे येत होते. दरम्यान, ब्राम्हणी येथील आरामशीनसमोर कळमेश्वरहून सावनेरकडे भरधाव जाणाऱ्या एमएच-४०/एन-२०४४ क्रमांकाचा ट्रक आणि दुचाकीत जोरदार धडक झाली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने कुणालचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, आकाश व अमरदीप हे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारार्थ कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेके करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 15 ... crime ... attachment ... 01

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.