१५... गुन्हे
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:58+5:302015-02-15T22:36:58+5:30
नरखेड शिवारातून बकऱ्या पळविल्या

१५... गुन्हे
न खेड शिवारातून बकऱ्या पळविल्यानरखेड : शेतातील गोठ्यात बांधलेल्या चार बकऱ्या आणि चार बोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नरखेड शिवारात शुक्रवारी मध्यरात्री घडली. फिर्यादी भूषण दिनेश खत्री (३२, रा. नरखेड ) यांची नरखेड - मोहदी (दळवी) मार्गावर शेती असून, शेतात गोठा आहे. त्यांनी त्यांच्या मालकीच्या बकऱ्या नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधल्या होत्या. दरम्यान, चोरट्यांनी त्या गोठ्यात प्रवेश करून चार बकऱ्या व चार बोकड चोरून नेले. या जनावरांची किंमत ३५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास हवालदार भटकर करीत आहे. ***संपत्तीच्या वादातून आईस मारहाणनरखेड : संपत्तीच्या वादातून मुलासह अन्य महिलेने आईस मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना नरखेड शहरात शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली.पंचफुला संपत गायधने (५२, रा. नरखेड) असे जखमी फिर्यादीचे नाव असून, किशोर संपत गायधने (३४, रा. नागपूर) असे आरोपी मुलाचे नाव आहे. पंचफुला व किशोर यांच्यात मागील काही दिवसांपासून संंपत्तीच्या वाटणीवरून वाद निर्माण झाला. दरम्यान, शुक्रवारी दुपारी यांच्यात वाद उद्भवला. या वादातून किशोर व त्याच्यासोबत असलेल्या एका महिलेने पंचफुला व तिच्या मुलाला मारहाण केली. यात पंचफुलाचा हात फ्रॅक्चर झाला. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी भादंवि ३२४, ३२५, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून आरेापींना अटक केली. सदर घटनेचा तपास संजय इंगोले करीत आहे.***कालव्यात बुडून एकाचा मृत्यूनागपूर : कालव्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलंगखेडी शिवारात गुरुवारी रात्री घडली. फुलचंद कवडू उइके (५०, रा. तेलंगखेडी) असे मृताचे नाव आहे. फुलचंदला दारूचे व्यसन होते. दरम्यान, तो दारूच्या नशेत तेलंखेडी शिवारातील कालव्यात कोसळला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सदर घटनेचा तपास सहायक फौजदार ठाकूर करीत आहे. ***