शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

केवळ तक्रारींसाठी आपले १५ अब्ज तास वाया; AI एजंट, चॅटबॉट्स होताहेत ग्राहक सेवेचा भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:39 IST

पारदर्शकतेचा अभाव, ग्राहकांमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा वापर सर्वत्र वाढत आहे. पूर्वी ज्या कामांसाठी तासन तास लागयचे, ती कामे आता एआयच्या मदतीने काही मिनिटांत किंवा सेकंदात पूर्ण करता येतात. मात्र, सर्व्हिस नाऊ कस्टमर एक्सपिरीयन्स रिपोर्टनुसार, भारतीय ग्राहकांनी गेल्या वर्षी ग्राहक सेवा तक्रार दाखल करण्यासाठी १५ अब्ज तासांहून अधिक वेळ वाट पाहण्यात घालवली.

एआय एजंट व चॅटबॉट्स ग्राहक सेवेचा झपाट्याने भाग बनत आहेत. असे असूनही, ग्राहकसेवेसाठी वाट पाहण्याच्या वेळेत लक्षणीय घट झाली नाही. ग्राहकांच्या अपेक्षा आणि सेवा वास्तवाचे विश्लेषण करण्यासाठी सर्व्हिस नाऊने ५,००० भारतीय ग्राहक आणि २०४ भारतीय ग्राहक सेवा एजंट यांचे एक सर्वेक्षण केले. अहवालानुसार, ८०% भारतीय ग्राहक तक्रारींसाठी एआय चॅटबॉट्सवर अवलंबून असतात. परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे, परंतु अपेक्षा व सेवा पुरवठ्यामध्ये अजूनही मोठी तफावत आहे.

पारदर्शकतेचा अभाव, ग्राहकांमध्ये असंतोष

अहवालानुसार, कंपन्यांच्या वेगवेगळ्या प्रणाली व ग्राहक सेवेतील पारदर्शकतेचा अभाव यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष वाढत आहे. ८९% भारतीय ग्राहकांनी सांगितले की ते खराब सेवेमुळे ब्रँड बदलण्यास तयार आहेत. ८४% ग्राहकांनी खराब सेवेमुळे ऑनलाइन किंवा सोशल मीडियावर नकारात्मक रिव्हू दिले.

३९% कॉल राहतात होल्डवर

अहवालानुसार, ३९% ग्राहकांचे कॉल होल्डवर ठेवले जातात, ३६% लोकांचे कॉल वारंवार ट्रान्सफर केले जातात आणि ३४% लोकांचा अस विश्वास आहे की कंपन्या जाणूनबुजून तक्रार प्रक्रिया गुंतागुंतीची करतात. सर्व्हिसनाऊ इंडियाने म्हटले आहे की, कंपन्यांना ग्राहक सेवांमध्ये सुधारणा करावी लागेल. अन्यथा, त्यांना ग्राहक गमावण्याचा धोका असू शकतो.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स