Red Fort Independence Day: १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर जायचं ठरवलंय? मग 'अशी' बूक करा सीट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:00 IST2025-08-12T13:58:24+5:302025-08-12T14:00:39+5:30

भारतात येत्या शुक्रवारी ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, देशाची राजधानी दिल्लीमध्ये तयारी पूर्ण झाली आहे.

15 August 2025: How to book your seat for Red Fort Independence Day celebrations | Red Fort Independence Day: १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर जायचं ठरवलंय? मग 'अशी' बूक करा सीट!

Red Fort Independence Day: १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर जायचं ठरवलंय? मग 'अशी' बूक करा सीट!

भारतात येत्या शुक्रवारी ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, देशाची राजधानी दिल्लीमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी लाल किल्ल्यावर पोहोचतात. १५ ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि देशवासियांना संबोधित करतात. हे दृश्य ऐतिहासिक आहे आणि स्वतःमध्ये देशभक्तीने भरलेले आहे. दरम्यान, मोठ्या संख्येत नागरिक स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी लाल किल्ल्यावर जातात. परंतु, यासाठी तिकीट काढणे आवश्यक आहे.१३ ऑगस्टपासून संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइट aamantran.mod.gov.in या वेबसाइटवर भेट देऊन तिकिटे बुक करू शकतात.

ऑनलाइन तिकीट कशी बूक करायची?

- सर्वात प्रथम संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइट aamantran.mod.gov.in किंवा e-invitations.mod.gov.in ला भेट द्या.
- त्यानंतर स्वातंत्र्य दिन २०२५ तिकीट बुकिंग 'हा' पर्याय निवडा.
- तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि तिकिटांची संख्या टाका.
- ओळखपत्रासाठी आधार कार्ड किंवा इतर कोणतेही वैध ओळखपत्र अपलोड करा.
- तिकिटांचे दर सीटनुसार निश्चित केले आहेत, तुमच्या आवडीची सीट निवडा.
- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा यूपीआयद्वारे पेमेंट पूर्ण करा.
- पेमेंट झाल्यानंतर क्यूआर कोड आणि तुमच्या सीटच्या तपशीलांसह एक ई-तिकीट मिळेल.
- हे तिकीट मोबाईलमध्ये सेव्ह करा किंवा त्याची प्रिंटआउट काढा. प्रवेशाच्या वेळी ते दाखवणे बंधनकारक असेल.

ऑफलाइन तिकिटे कशी मिळवायची?

१० ते १२ ऑगस्ट दरम्यान दिल्लीतील निवडक सरकारी इमारती आणि विशेष काउंटरवरून ऑफलाइन तिकिटे खरेदी करता येतील. परंतु, या तिकिटांना जास्त मागणी आहे, त्यामुळे तुम्हाला ती लवकर खरेदी करावी लागतील.

Web Title: 15 August 2025: How to book your seat for Red Fort Independence Day celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.